Home नांदेड देगलूर महाविद्यालयात विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

देगलूर महाविद्यालयात विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_065514.jpg

देगलूर महाविद्यालयात
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर: भारतीय संविधानाची निर्मिती त्यातील विविध कलमे आणि मानवाला दिलेले हक्क यामुळे भारत याच बरोबर जगाची प्रगती होऊ शकली आहे असे प्रतिपादन डाॅ रत्नाकर लक्षट्टे यांनी केले ते येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्तआयोजित व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ होते .
संविधानाच्या माध्यमातून झालेली भारताची उन्नती , यामुळेच भारत हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ देश होत आहे, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीचा जाणता राजा म्हणून उल्लेख करत त्यानी सर्व समाज घटकासाठी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व आणि हक्क बहाल केले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र आपण वाचले पाहिजे. त्यांचा आदर्श आपण अंगीकारला पाहिजे. डॉ. आंबेडकर प्राध्यापक असताना सुद्धा त्यांना काटकसरीने जीवन जगावे लागले. आपल्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन विविध प्रकारच्या पदव्या संपन्न केल्या व भारताचे सर्वश्रेष्ठ ज्ञानी व्यक्ती बनले.
प्रारंभी प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देवा पेक्षाही भरभरून दिले आहे असे मत यावेळी मांडत या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी हिंदू कोडबिल, ओबीसींसाठी स्वतःच्या जातीपेक्षाही पहिले कलम, वंचितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी संरक्षण देण्याचे काम भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केले आहे. असे गौरव उदगार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शिवचरण गुरूडे तर आभार प्रा. डॉ. धनराज लझडे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.डॉ. अनिल चिद्रावार ,डॉ.व्हि जी शेरीकर,
प्रा.डाॅ चंद्रशेखर बाकेवाड, प्रा. लागले, प्रा. भुरे प्रा. प्रमोद गुजे , डॉ नरेंद्र मुक्तावार , प्रा.खुशाल पाटील प्रा.हणमंत वाकडे आदी सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here