Home Breaking News मालेगाव लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने...

मालेगाव लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या मालेगाव नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंदआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे*

122
0

*मालेगाव लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या मालेगाव नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंदआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे*
मालेगाव : (एन.पी.वाघ प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील तमाम केशकर्तनालय चालक, मालक, कारागीर यांनी शासनाला सहकार्य करताना आपली दुकाने बंद ठेवली. परंतु, शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही केशकर्तनालये उघडण्यास परवानगी दिलेली नाही.
नाभिक समाजाचा उदरनिर्वाह पारंपरिक नाभिक व्यवसायावरच अवलंबून आहे. या समाजातील ९० टक्के लोकांकडे शेती नाही, अनेकांची दुकानेही भाडेपट्ट्याने घेतलेली आहेत. समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लॉकडाऊन आणि उपासमारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी मालेगाव नाभिक समाज संघटनेच्या वतीने हत्यार बंद आंदोलन केले दि १०.०६.२०२० रोजी चंद्रशेखर सोनवणे मालेगाव नाभिक समाज जिल्हा अध्यक्ष व अतुल आहिरे अध्यक्ष मा.नाभिक समाज यांचे आदेशानुसार मालेगाव शहर नाभिक संघातर्फे डि के काॅनर सोयगाव येथे सोशल डिस्टनशिंग चे पालन करून शिस्तबद्ध पध्दतीने सरकारी लक्ष वैधण्यासाठी नाभिक दुकानदार व क कारागीर यांना लाॅकडाऊन दरम्यान दर महा १०.००० रुपये मदत द्यावी व मागण्यांसाठी मुक आंदोलन केले त्यावेळी दुकानदार बांधव हातात मागण्यांचे फलक घेऊन सहभागी होते मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आधिक त्तीव करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी शहर अध्यक्ष दिनेश सोनवणे अतुल आहिरे तात्या निकम बंटी महाले दिनेश सोनवणे सागर सैदाणे योगेश वाघ रवि आहिरे विशाल पगारे आदी दुकानदार उपस्थित होते

Previous articleKDMC मध्ये मोठी भरती
Next articleबीडीडी चाळीतील मराठी माणसाची आता उद्योगाकडे वाटचाल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here