Home Breaking News बीडीडी चाळीतील मराठी माणसाची आता उद्योगाकडे वाटचाल

बीडीडी चाळीतील मराठी माणसाची आता उद्योगाकडे वाटचाल

129
0

🛑 बीडीडी चाळीतील मराठी माणसाची आता उद्योगाकडे वाटचाल 🛑
✍️मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕ मी संदीप येलकर आणि माझा मित्र गणेश तावडे राहणार वरळी बी डी डी चाळ, आज आम्ही एक छोटासा वडापावचा व्यवसाय चालू केला आहे. तसे व्यवसाय करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आमचे ही होते. पण कधी व्यवसाय करण्याची गरज पडली नाही. कारण नोकरीमध्ये आजपर्यंत आम्ही आणि आमचे कुटुंब खूप उत्तम जगत होतो. पण आज जगावर कोरोनाचे संकट कोसळलेले आहे. त्यामुळे आम्ही आज उद्योगाकडे वळलो आहे. कारण दोन अडीच महिने जे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे घरी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामध्ये कंपनीने पगार देण्यास नकार दिल्याने आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली.

आम्हाला आज तुमची साथ हवी आहे जसे परप्रांतीय कसे त्यांच्या राज्यातल्या माणसांना साथ देतात तशीच तुमचीही साथ आम्हाला हवी आहे. आम्ही घरातच वडापाव तयार करत आहेत. तसेच यामध्ये आमचे पूर्ण कुटुंब आम्हाला मदत करतो आहे.

आम्हाला या व्यवसायासाठी वरळीतील नागरिकांची साथ हवी आहे. हा व्यवसाय करण्यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेऊ. आम्ही वरळीकरच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आमचा वडापाव विकत घेऊन आम्हाला साथ द्या आणि प्रत्येक मराठी माणसाने उद्योगात यावे, असं आवाहन करतो.

वडापाव हवे असल्यास 8286423867 या नंबरवर संपर्क करा.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here