• Home
  • निसर्ग चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांची रायगड, रत्नागिरी जिल्ह्याची पाहणी

निसर्ग चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांची रायगड, रत्नागिरी जिल्ह्याची पाहणी

  1. 🛑 निसर्ग चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांची रायगड, रत्नागिरी जिल्ह्याची पाहणी 🛑
    ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रायगड,रत्नागिरी ⭕निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्याचे आयोजन केले आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांवर संकटे आली असता ती मी पाहिली आहेत. मात्र यावेळचे संकट दुहेरी आहे. एक बाजूला आपण कोरोनाच्या संकटाशी लढत आहेत.

रायगड भागात ७५४ कोरोना रूग्ण आढळले असून कोरोनामुळे २९ जणांनी जीव गमावलाय. या परिस्थितीत अनेकांवर आर्थिक बोजाही वाढलेला आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती कशी करता येईल यावर भर दिला असतानाच हे निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले.

या भागात मुख्यत्वे मत्स्य उत्पादन तसेच भात व फळबाग शेती केली जाते. चक्रीवादळात नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. दुष्काळात एक पीक जाते, पण नारळाची बाग उध्वस्त झाली तर पुन्हा उभी करण्यासाठी पुढील ८-१० वर्षे लागतात. याचा विपरीत परिणाम येथील शेतकऱ्यांवर होऊ शकतो.

आता या भागातील जमीन पूर्ववत करण्यासाठी काय करावे हा प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी जालना आणि काही भागात मोसंबी पीकाचे नुकसान झाले असता तेथील फळ बागायतदारांना केंद्र सरकारकडून योग्य मदत मिळवून देण्यात आली होती. या भागात देखील असा प्रयत्न करता येईल का याचा निश्चितच विचार करू.

सध्या मत्स्य व्यवसाय कोरोनामुळे बंद पडला आहे. त्यासाठी वेगळे पॅकेज देण्याची गरज आहे. ही वस्तुस्थिती राज्य व केंद्र सरकारला दाखवण्यात येईल. तसेच या भागात अदानी, टाटा, रिलायन्स या कंपन्यांची मदत घेऊन वीज पुरवठा व पाणी पुरवठा तात्काळ सुरू कसा करता येईल याकडे लक्ष देत आहोत.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे होण्याची गरज आहे. यात घरे, शेती, झाडे,जनावरे या सगळ्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागात कच्च्या घरांचे प्रमाण जास्त असते. ती घरे भिजून उन्हात सुकल्यानंतर पडण्याची भीती जास्त असते, हे ध्यानात घ्यावे लागेल.

तसेच नुकसान झालेल्या भागात तांदूळ, गहू, डाळीचा पुरवठा राज्य सरकारकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील एक-दोन दिवसात याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

हे महाराष्ट्रावरचे संकट आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करण्याची गरज आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी पाहण्याची वेळ नाही. एकत्र येऊन संकटावर मात करण्याची ही वेळ आहे.

लातूरमधील किल्लारी सारखी योजना या भागात करण्यासाठी काही अडचणी आहेत. इथे जमीन कमी आहे, इथली घरे दुरुस्त करण्यासाठी, लोकांना अधिवास निर्माण करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना थेट मदत कशी देता येईल यावर भर देण्यात येईल.

अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी प. बंगालला केंद्राने जे पॅकेज दिलं त्याबद्दल माझे दुमत नाही. त्याठिकाणी १८ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान मोदींनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवाव.⭕

anews Banner

Leave A Comment