Home Breaking News 🛑 पुण्याच्या अवती भवती कॉसमॉस फुलांचे जाळे 🛑

🛑 पुण्याच्या अवती भवती कॉसमॉस फुलांचे जाळे 🛑

88
0

🛑 पुण्याच्या अवती भवती कॉसमॉस फुलांचे जाळे 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सध्या पुण्याच्या अवतीभोवती कोणत्याही दिशेला गाडी प्रवास करताना आपणास या फुलांचे ताटवे रस्त्याच्या दुतर्फा दिसतात

खुपच सुंदर दिसतात ही फुले. या फुलांची वनस्पती साधारण तीन ते चार फुटांपर्यंत वाढु शकते. एका झाडास दोन तीन डझनापेक्षा जास्त फुले येतात. हा फुलोरा इतका दाट असतो की रस्त्याच्या दुतर्फा केसरी,पिवळी चादरच अंथरली आहे असे वाटते.

काय आपणास हे माहित आहे का की ही वनस्पती पश्चिम घाटातील नाहीये. साधारण वीसेल वर्षांपुर्वी अशी फुले दिसत नव्हती. सह्याद्रीची म्हणुन जी काही फुले आहेत त्यामध्ये यांचा समावेश नव्हता. आपल्या पर्यावरणात मिसळुन जाईल अशी देखील ही फुले नाहीत. या फुलांना रंग सोडला तर आणखी काही कौतुक करण्यासारखे नाही. तण वाढावे तशी ही वनस्पती पसरत चालली आहे. आणि हिचा पसरण्याचा वेग व तग धरुन राहण्याची क्षमता कमालीची जास्त आहे. सुगंध नाही तसेच गाई-गुरांना चारा म्हणुनही यांचा वापर होऊ शकत नाही. याउलट गाई गुरे खातील असे गवत वा अन्य वनस्पतींना वाढण्यास जागाच राहत नाही या फुलझाडांमुळे. बर, ही फुले तोडुन यांचा हार करावा, पुजा-प्रार्थनेमध्ये वापरावी म्हंटले तरी ही फुले तशी नाहीत. तोडली की लागलीच कोमेजुन जातात. मधमाश्या, अथवा भुंगे या फुलांकडे आकर्षित होताना दिसत नाहीत. पर्यावरणास कोणत्याही पध्दतीने पुरक नसलेल्या या वनस्पतीला कॉसमॉस म्हणतात. याच्या बीजांचा प्रसार वा-यासोबत होतो. विशेषतः गाडीवेगाने जाताना, गाडीमगे जो वा-याचा आवेग असतो त्यामुळे ही जास्त पसरली जाते. नशीब चांगले म्हणुन अद्याप सह्याद्रीच्या मावळ पट्ट्यात ही पसरली नाहीये.

पण जर का एकदा हिचा प्रसार डोंगर द-यांमध्ये झाला तर तर स्थानिक, मुळच्या इथल्या असलेल्या वनस्पतीस तसेच जैवविविधतेस प्रचंड धोका भविष्यात संभवतो.
एकेकाळी कॉन्ग्रेस (गाजरगवत) नावाची एक वनस्पती आपल्याकडे खुपच फोफावली, इतकी की अन्य पिकांवर देखील तिचा विपरीत परिणाम होऊ लागला होता. हि कॉन्ग्रेस देखील भारतीय नव्हती. कधीकाळी अमेरिकेतुन आलेल्या गव्हासोबत याचे बीज आले व या कॉन्ग्रेस ने थयथयाट केला होता. कालांतराने धोका जानवु लागल्यावर कॉन्ग्रेस चा बिमोड करण्यात आपल्याला यश आले खरे.

पण कॉसमॉस च्या बाबतीत असा बिमोड करणे अजुनही दुरापास्त होईल कारण याच्या बीजांचा प्रसार वा-यासोबात कुठेही होत असतो. पडीक जमिनी, डोंगर उतार, द-या यांवर जर यांचा प्रसार झाला तर कोण बिमोड करु शकेल याचा ? खुप अवघड होणार आहे हे प्रकरण पर्यावरनासाठी. त्यामुळे आत्ताच सावध होऊन, ज्या ठिकाणी एखाद दोनच फुलझाडे आहेत अशी, म्हणजेच कॉसमॉ, त्या ठिकाणी त्यांना मुळासकट उपटुन टाकणे सोपे आहे.
सह्याद्रीच्या गावागावात ही माहिती पोहोचवा.

गाईगुरे चारणारांपर्यंत पोहोचवा म्हणजे फुलोरा सुकून जाण्यापुर्वीच, अथवा फुलोरा येण्यापुर्वीच जर उपटले तर बिमोड करणे शक्य होईल…..⭕

Previous articleमुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार सुरेखा महाडिक शहीद…!
Next article🛑 *सातारा ५ लाख ७० हजाराचा महासागर परत करणारा प्रशांत* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here