Home Breaking News मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार सुरेखा महाडिक शहीद…!

मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार सुरेखा महाडिक शहीद…!

97
0

🛑 मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार सुरेखा महाडिक शहीद…! 🛑
✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोरोना संकट काळात कोरोनाची (कोविड-१९) लागण झालेल्या महिला पोलीस शिपाई सुरेखा महाडिक(सुरेखा प्रशांत उनावकर) यांना दि. ११ आॅक्टोबर २०२० रोजी वीरमरण आले. त्या ४० वर्षांच्या होत्या.

सन २००१ साली मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या पोलीस शिपाई सुरेखा महाडिक या विशेष शाखा – २ (एसबी – २) येथे कर्तव्याला होत्या. सद्या त्या मुंबई विमानतळ येथे कर्तव्य बजावत होत्या. गेल्या ८ दिवसांपूर्वी त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने सुरेखा महाडिक यांनी कोरोनाची चाचणी केली.

कोविड-१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न होताच सुरेखा महाडिक या ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील वैद्य रुग्णालयात दाखल झाल्या. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. अखेर उपचारादरम्यान त्यांचा ११ ऑक्टोबर रोजी त्यांना वीरमरण आले.

आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे मुंबई पोलीस खात्यात स्वत:ची विशेष ओळख असलेल्या पोलीस शिपाई सुरेखा महाडिक यांचे निधन झाल्याची माहिती सोशल मीडियावर वायरल होताच अनेकांना धक्का बसला. सुरेखा महाडिक यांच्या रूपात एक कर्तव्य दक्ष सहकारी गमावल्याने पोलीस खात्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला…⭕

Previous article🛑 हॉटेल रात्री नऊपर्यंत खुले 🛑
Next article🛑 पुण्याच्या अवती भवती कॉसमॉस फुलांचे जाळे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here