• Home
  • *गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा*

*गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा*

*गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा* मालेगांव,( श्रीमती आशा बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- मालेगाव तालुक्यातील गरबड गावात आदिवासी विचार मंच व एकलव्य संघटना गरबड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.मा. सरपंच चिंतामण भांगरे अध्यक्षस्थानी होते.धरती आबा बिरसा मुंडा,आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान वीर एकलव्य,राणी दुर्गावती,खाजा नाईक यांच्या प्रतिमांचे पुजन केले.विष्णू भांगरे,भीमराव भांगरे,झेलाबाई सोनवणे, नाना रगतवाण, संजय भांगरे विचारपीठावर उपस्थित होते.गोरख नाडेकर यांनी प्रास्ताविक केले. आनंदा माळी यांनी वीर एकलव्य चरित्र वर्णन केले. समाधान गुमाडे यांनी आदिवासी दिनाचे महत्व सांगितले. गोरख भांगरे यांनी राघोजी भांगरेची शौर्यगाथा सांगितली.पांडुरंग गुमाडे यांनी धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रसंग सांगितले.नितीन गुमाडे यांनी क्रांतीकारकांचे पोवाडे सादर केले.शासकीय आश्रम शाळेतही कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. वृक्षारोपण करण्यात आले. सुभाष गुमाडे,बापू वेडेकर, विष्णू गुमाडे, पोपट भांगरे,वसंत भांगरे, धाकु नाडेकर, प्रहलाद पेढेकर, प्रसाद गुमाडे, लक्ष्मण पेढेकर, भीमा माळी, सुरेश गुमाडे, दगा सोनवणे ,चुणीलाल भांगरे, नितीन गायकवाड, गुलाब भांगरे, रंगनाथ भोईर,भावडू गुमाडे, समाधान बगाड,देविदास कावळे,शरद गुमाडे,बाबाजी माळी, भीमा माळी, गोविंदा गुमाडे, अमोल सोनवणे, रामदास घोडे,रोहित सारुकते,निवृत्ती घोडे, काकाजी भांगरे,जितेंद्र रगतवाण, काशिनाथ गुमाडे,संजय सोनवणे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. बजरंग गुमाडे यांनी सूत्रसंचालन केले तर नागेश गुमाडे यांनी आभार मानले.

anews Banner

Leave A Comment