Home Breaking News *एसटीला राज्य शासनाचा दर्जा मिळावा*

*एसटीला राज्य शासनाचा दर्जा मिळावा*

117
0

*एसटीला राज्य शासनाचा दर्जा मिळावा*
*महाराष्ट्र एस टी कर्मचारी* *काँग्रेसची मागणी*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

एस टी महामंडळास राज्य शासनाचा दर्जा द्यावा किंवा महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीचा संदेश शासन दरबारी पोहचविण्यासाठी आपल्या संघटनेच्यावतीने आज हुतात्मा क्रांती दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे परेल येथे हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सरचिटणीस बरगेसाहेब व अन्य चार सहकारी यांनी हुतात्मा क्रांती चौक येथपर्यंत पदयात्रा काढली.
सद्या एस.टी.ची अवस्था बिकट असुन ना नफा ना तोट्यावर चाललेली एसटी.आज कामगारांचे पगार देण्यासाठी एस.टी.ची तिजोरी रिकामी पडाली आहे.कामगारांचे पगार भागविण्यासाठी सतत सरकारकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे.
प्रवाश्यांना सेवा सवलती देऊन , डिझेलवरील कर , टोल टँक्स भरून एस.टी.ची चाके आणखीच तोट्यात रोवली गेली आहे.
लाँकडाऊन मुळे एस.टी.ची चाके फिरायची बंद झालेने अगोदरच दोन हजार कोटी रूपयाचा तोटा सहन करता करता आणखीनच लाँकडाऊनची भर पडली आहे.
अत्यावश्यक सेवा बजावनारी लालपरीला आज आतोनात गरज आहे ती म्हणजे शासकीय दर्जा मिळण्याची. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस .टी.कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे आणि शासकीय कर्मचारी घोषित करावे.
विविध स्तरावरून एस.टी.शासनात विलनिकरन करण्यासाठी जोरदार मागणी होत असुन सरकारने जाणिव पुर्वक लक्ष देणे आज काळाची गरज आहे .
सदर पदयात्रेमध्ये आदरणीय आमदार भाई जगताप साहेब यांनी नेतृत्व करत हुतात्मा चौकात क्रांतीवीर यांना अभिवादन केले,त्याप्रसंगी आपल्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात, वर्षाताई गायकवाड,एकनाथ गायकवाड तसेच खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे याना दिले.
याउपक्रमाबद्दल आदरणीय आमदार भाई,बरगेसाहेब व सन्माननीय पदाधिकारी यांचे योगदान लाभले.

Previous article*गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा*
Next articleपेठ वडगांव मधे कर्नाटक सरकारच्या निषेर्धात तिरडी मोर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here