Home Breaking News शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’

शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’

98
0

शिक्षकांसाठी
‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

कळवण( बाळासाहेब निकम /आनंद नागमोती युवा मराठा न्युज नेटवर्क)-‘शिक्षक ध्येय’ तर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक मनापासून प्रयत्न करीत आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.
राज्यातील शिक्षकांमधून सात गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
1) अंगणवाडी गट
2) प्राथमिक गट (पहिली ते चौथी)
3) माध्यमिक गट (पाचवी ते दहावी)
4) उच्च माध्यमिक गट (अकरावी ते बारावी)
5) मुख्याध्यापक (गट)
6) शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी (गट)
7) शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्ति (गट)
सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
उपक्रम अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
1) उपक्रमाचे शीर्षक
2) उपक्रमाची गरज व महत्त्व
3) नियोजन
4) प्रत्यक्ष कार्यवाही
5) निष्कर्ष
6) फायदे
7) परिशिष्टे
8) उपक्रमाची सद्यस्थिती
9) यु-टूब व्हिडीओ लिंक
10) स्वत: शाळेत राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र
या मुद्द्यांचा समावेश असावा.
शब्दमर्यादा 2000 शब्द असून जास्तीत जास्त 8 फोटोचा वापर करावा. अहवाल 10 एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून ८८०५३६७१३५ व्हाट्सअॅप नंबरवर व्हाट्सअॅपनेच पाठवायचा आहे.
शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तयार करावा.
उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2020 आहे. नमुना उपक्रमासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1Dcpl4nRp1Me7o9XaXVCs1-m7SNe_1t8t/view?usp=drivesdk

प्रत्येक गटातील प्रथम दहा उपक्रमशील शिक्षकांना आणि प्रत्येक गटात चार उत्तेजनार्थ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र कुरिअरने पाठविण्यात येईल तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मेलवर/व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.
दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल.
दि. 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिनी’ निकाल जाहीर करण्यात येईल.
राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’चे मधुकर घायदार, प्रभाकर कोळसे (वर्धा); किशोर पाटील कुंझरकर (जळगाव); प्रशांत म्हस्के (अहमदनगर); मिलिंद पगारे (नाशिक); अशरफ आंजर्लेकर (रत्नागिरी); निलेशकुमार इंगोले (अमरावती); माधव गावीत (औरंगाबाद); डॉ. अमोल बागूल (अहमदनगर); नितीन केवटे (नाशिक); विशाल टिप्रमवार (औरंगाबाद); दिलीप वाघमारे (सांगली); कविता चौधरी (जळगाव); दीपाली बाभुळकर (अमरावती); डॉ. मनीषा पवार-पाटील (जळगाव); राजश्री कोष्टी (नाशिक); प्रशांत पेंधे (ठाणे); डॉ. सुधीर अग्रवाल (नागपूर); वैभव चेके (बुलडाणा); विनोदकुमार माने (गोंदिया); सतेशकुमार माळवे (सातारा); अरुणा उदावंत (जळगाव); प्रणाली कोल्हे (नागपूर); विष्णू ढेबे (सातारा); प्रेमजीत गतीगंते (मुंबई); परेश पडोळकर (बुलडाणा) यांनी केले आहे.

सोबत एक फोटो आहे

लोगो

Previous article🛑 गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा, ई-पाससाठी गणेशोत्सवाचा पर्याय उपलब्ध 🛑
Next article*गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here