Home Breaking News 🛑 गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा, ई-पाससाठी गणेशोत्सवाचा पर्याय उपलब्ध 🛑

🛑 गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा, ई-पाससाठी गणेशोत्सवाचा पर्याय उपलब्ध 🛑

98
0

🛑 गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा, ई-पाससाठी गणेशोत्सवाचा पर्याय उपलब्ध 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 9 ऑगस्ट : ⭕ कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत राज्याअतंर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. ई-पास शिवाय एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण प्रवास करणे त्यामुळे शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हीच बाबत लक्षात घेत मुंबई पोलिसानी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत आहे. आता यामध्ये गणेशोत्सवाचा पर्यायही सामील करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होतील. मुंबईतील नागरिकांनी https://mumbaipolice.co.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकारने याबाबत रेल्वे खात्याला पत्र लिहिलं आहे. प्रवाशांनी केलेल्या तिकीट बुकिंगनुसार गाड्या सोडल्या जाणार आहेत. आरक्षित तिकीट हाच ई-पास असणार आहे. रेल्वेने राज्य सरकारला याबाबत विचारणा केली होती.

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी 5 ऑगस्टपासून एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रचलित तिकीट दरात, आगाऊ आरक्षण 4 ऑगस्ट मध्य रात्रीपासून सुरू झाले आहे. एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी घेऊन एसटी बसेस 5 ऑगस्टपासून 12 ऑगस्टपर्यंत सोडण्यात येत आहेत. बसेसचे आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. तसेच, सदर बसेस ह्या विनाथांबा असल्याने (नैसर्गिक विधी वगळून)शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त कुठेही थांबणार नाहीत.⭕

Previous article🛑 छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला…..! शिवभक्तांमध्ये संतापाची भावना 🛑
Next articleशिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here