Home गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती

132

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0158.jpg

जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती

विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कारमूर्तींचे केले अभिनंदन                                                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. यावेळी जिल्हाधिकारी संजय कुमार मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हा पोलीस अधीक्षक , जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी , उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी वृंद नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपल्या क्षेत्रात विशेष कर्तुत्व गाजविणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मानपत्र ,सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात

Previous articleकासुर्डी,दौंड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next articleमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात ध्वजारोहन..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.