Home पुणे कासुर्डी,दौंड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कासुर्डी,दौंड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

184

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0106.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: कासुर्डी दौंड, पुणे या ठिकाणी भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम खूप उत्साहा मध्ये पार पडला. सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जय हिंद विद्यालय कासुर्डी या दोन्ही शाळांनी तिरंगा रॅलीची मिरवणूक काढून मंदिरासमोर आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशावर आधारित भाषण केले. त्यानंतर जयहिंद विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गाण्यावर नृत्याचा कार्यक्रम केला व काही विद्यार्थ्यांनी सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाचा देखावा हुबेहूब सादर करून अंगावर शहारे येईल असे प्रकारे त्यांनी देखावा सादर केला. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देत जोरदार आवाजामध्ये उत्साह साजरा होत होता त्यानंतर गावातील गावकरी मंडळींनी देशावरचे मनोगत व्यक्त केले .अशाप्रकारे कासुर्डी या गावी देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन खूप उत्साह मध्ये पार पडला. हा कार्यक्रम करत असताना आर्मी मेडिकल कॉलेजच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पायातील शूज देऊन त्यांच्याबरोबर आनंद साजरा केला.

Previous articleशितोळे शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा…
Next articleजिल्हाधिकारी कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.