Home पुणे शितोळे शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा…

शितोळे शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा…

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0155.jpg

शितोळे शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा…..
सांगवी/पुणे,-उमेश पाटील प्रतिनिधी :– छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशिविहर,नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदरबाई भानसिंग पूजा गुरु गोविंद इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साह साजरा झाला. सकाळी सात वाजता सांगवी परिसरातून भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. सर्व विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून देशाबद्दलची आत्मीयता, तिरंग्या बद्दलचे राष्ट्रप्रेम दाखवले. प्रत्येकाला तिरंग्याचे महत्व, तिरंग्याचे आचारसंहिता विद्यार्थ्यांनी लोकांना सांगितले .शाळेच्या मैदानावर 24 मराठा बटालियनचे अधिकारी माननीय चौधरीसाहेब व प्रगतशील शेतकरी सखाराम देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कॉन्सन्ट्रिक्स कंपनीचे अधिकारी मा. विक्रांत पांडे व मा.अग्रवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व कंपनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शाळेतील गोरगरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना दत्तक घेऊन एकूण वीस विद्यार्थ्यांची 77 हजार रुपये भरली व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून प्रथम आलेल्या वीस विद्यार्थ्यांना संपूर्ण स्टेशनरी व दप्तर व खाऊवाटप करण्यात आले. यावेळी 24 मराठा बटालियनचे अधिकारी मा. चौधरीसाहेब, शेतकरी सखाराम देवकर, संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब जंगले, कार्याध्यक्ष प्रशांतजी शितोळे, सचिव तुळशीराम नवले, खजिनदार रामभाऊ खोडदे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, शारदाताई सोनवणे, सातारा मित्र मंडळाचे खजिनदार सोमनाथ कोरे, उपाध्यक्ष महेश भागवत, प्रकाश पाटील, मुख्याध्यापक शिवाजीराव माने ,इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरती, माध्यमिक प्रमुख शितल शितोळे, शिशुविहार प्रमुख संगीता सूर्यवंशी, नर्सरी प्रमुख शितल गरसुंड, उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्तात्रय जगताप, भाऊसो दातिर, स्वप्निल कदम, सुनिता टेकवडे, सीमा पाटील, हेमलता नवले ,मनीषा लाड, श्रद्धा जाधव, दिपाली झणझणे ,तपस्या सोमवंशी ,भाग्यश्री रापटे, संध्या पुरोहित, गायत्री कोकाटे, नीता ढमाले, निर्मला भोईटे ,मनीषा गायकवाड, कुसुम ढमाले, चेतना इंगळे ,रोहिणी सावंत सर्व इंग्रजी माध्यम शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी माने यांनी व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले

Previous articleजिंतूर येथील ऑर्किडस् इंटरनॅशनल स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Next articleकासुर्डी,दौंड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here