Home मुंबई मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती- माणगाव तालुका आयोजित ” दिंडीयात्रा ” आंदोलन

मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती- माणगाव तालुका आयोजित ” दिंडीयात्रा ” आंदोलन

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20230705-WA0037.jpg

मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती- माणगाव तालुका आयोजित ” दिंडीयात्रा ” आंदोलन

मुंबई :- ( प्रतिनिधी विजय पवार )
दि-०४.०७.२०२३ रोजी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती-माणगाव तालुका आयोजित “दिंडीयात्रा” अगदी कोकणकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी ठरली.
सकाळी १०:३० वाजता आंब्रेला हॉटेल शेजारी सर्व कोकणकरांनी टाळ मृदूंगाच्या सुमधुर आवाजात भजनावर ठेका धरला. यानंतर सदर दिंडी माणगाव आगार येथे पोहचली.
माणगाव आगार ते प्रांत अधिकारी कार्यालय अशा ०१ किलोमीटरच्या दिंडीयात्रेला ११:४५ वाजता सुरुवात करण्यात आली तर ही दिंडी प्रांतधिकारी यांच्या द्वारी १:०० वाजता पोहचली.
यानंतर शिष्टमंडळ उप-जिल्हाधिकारी यांच्या दालनात निवेदन देण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी ठेकेदार,जनआक्रोश समिती शिष्टमंडळ, विविध उपस्थित संघटनेचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात मिटिंग पार पडली.सदर चर्चेत स्थानिकांनी अनेक मुद्दे अधिकारी वर्गासमोर मांडले.यावर सखोल चर्चा झाल्यानंतर उप-जिल्हाधिकारी यांनी उपस्थित कोकणकरांना संबोधित केले व आश्वासन दिले की आपण मांडलेले सर्व मुद्दे लवकरात लवकर सोडविण्यासाठी एकत्रित पाहणी करून ०८ दिवसात पुन्हा याच दालनात मिटिंग घेण्यात येईल व आपले प्रश्न सोडविले जातील याबाबत आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here