Home बुलढाणा शेगावचे गटविकास अधिकारी एस व्हि देशमुख बदली होऊनही अद्याप शेगावची कार्यरत

शेगावचे गटविकास अधिकारी एस व्हि देशमुख बदली होऊनही अद्याप शेगावची कार्यरत

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_161757.jpg

शेगाव: युवा मराठा न्युज मोताळा तालुका प्रातिनिधी संजय पन्हाळकर गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेगाव येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांची वरुड जिल्हा अमरावती येथे 23 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने लोकसभा निवडणूक अनुषंगाने केलेल्या बदल्यांच्या यादीमध्ये नाव होते मात्र कित्येक दिवस होऊनही जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना अद्याप कार्यमुक्त का केले नाही? असा सवाल शेगाव तालुक्यातील नागरिकांना तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी कर्मचारी यांना उपस्थित झाला आहे.विशेष म्हणजे बीडिओ सतीश देशमुख हे शेगाव येथे एसबीआय कॉलनी मध्ये स्वतःचे घरामध्ये राहतात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये खामगाव तालुक्यात त्यांचे कुंभेफळ हे मूळ गाव आहे. असे असतानाही त्यांना होम डिस्ट्रिक्टमध्ये का ठेवण्यात आले. याबाबत अनेक प्रश्न व्यक्त करण्यात येत असून, वरिष्ठ पातळीवर काहीतरी शिजले असावे अशी चर्चा पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागातील त्रस्त नागरिकांमध्ये होत आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्याचे सी ओ मॅडम विसपुते यांची सुद्धा बदली करण्यात आली होती त्यांच्या जागी विशाल नरवाडे हे रुजू सुद्धा झाले होते मात्र ते जिल्ह्याचेच भूमिपुत्र असल्यामुळे त्यांची परत बदली करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून शेगाव येथील गटविकास अधिकारी यांची सुद्धा बदली झाल्यानंतरही त्यांनी पदभार का सोडला नसेल असा प्रश्न सुद्धा नागरिकांसमोर उपस्थितीत झालेला आहे कारण विशाल नरवाडे हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांची बदली त्वरित करण्यात आली मात्र शेगाव येथील गटविकास अधिकारी हे सुद्धा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहे यांची तर बदली होऊनयही त्यांनी अजूनही पदभार सोडलेला नाही पण वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई का करत नसेल असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कोणी दबाव तर आणला नसेल ना असा सुद्धा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे…. पण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब याकडे लक्ष देतील का असा सवाल नागरिकांमध्ये पडला आहे आहे.

Previous articleकोथळी येथे हाणामारी; १२ जणांवर गुन्हा दाखल
Next articleबीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here