Home बीड बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_162413.jpg

बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: २२ मार्च  जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई होण्याची गंभीर शक्यता असल्याने जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ/मुंडे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आदेश जारी करण्यात आले. जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या पेरणी अहवालानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी १८६४५८.७७ मे टन चारा शिल्लक असून तो अंदाजे ४३ दिवस पुरेल चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासू शकते. जिल्ह्यातून उपलब्ध होणारा सर्व प्रकारचा चारा याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणणे जिल्ह्याबाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये. जेणेकरून बीड जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ/मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार बीड जिल्ह्यात उत्पादित होणारा किंवा सद्यस्थितीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला व ओला चारा बीड जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास पुढील आदेश येईपर्यंत मनाई करण्यात आली आहे.

Previous articleशेगावचे गटविकास अधिकारी एस व्हि देशमुख बदली होऊनही अद्याप शेगावची कार्यरत
Next articleदेशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या वतीने २८ रोजी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here