Home नाशिक नांदगावला जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

नांदगावला जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

125

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0056.jpg

नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे                सर्वसामान्य दीन उद्घाटन प्रंसगी दलित अत्याचार पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी मागे हटू नका जनसेवेच्या या कार्यात जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन चे संपूर्ण संघटन आपल्या पाठीशी सर्व शक्तीनिशी राहील असे प्रतिपादन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी केले.प्रहार जनशक्ती पक्ष नांदगाव तालुका अध्यक्ष तथा जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉ जनार्दन पगार व तालुका अध्यक्ष यशवंतराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन आज नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुवासिनींनी औक्षण केले व प्रमुख उपस्थिती लाभलेले जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय बोडखे माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ यांचे हस्ते फित कापून संपर्क कार्यालयाचे रीतसर उदघाटन पार पडले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ,प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बोडखे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन चे नांदगाव तालुका अध्यक्ष तथा जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी केले.याप्रसंगी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल जाधव,युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी जळगाव महिला जिल्हाध्यक्षा कलाताई शिरसाठ,भडगाव तालुका अध्यक्ष माजी सैनिक मनोहर पाटील,चाळीसगाव तालुका अध्यक्ष गोकुळ पाटील नांदगाव महिला तालुका अध्यक्षा सविता पगार प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.जिल्हा अध्यक्ष डॉ, जनार्दन पगार यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous articleउमराणेत धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित जाणता राजा मंडळाकडून शिवचरित्र भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न
Next articleसंग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावामध्ये बैल पोळा  सण साजरा करण्यात आला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.