Home नाशिक देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या वतीने २८ रोजी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन

देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या वतीने २८ रोजी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन

92
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_162657.jpg

*

देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या वतीने २८ रोजी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी देशस्थ ऋग्वेदी संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा संस्थेच्या नाशिक येथील तिडके कॉलनी येथे ऋग्वेद कार्यालयात संपन्न होणार आहे. प्रत्येक व्रतबंधासाठी रु. ३५००/- शुल्क आकारण्यात येणार असून त्यामध्ये सर्व धार्मिक विधी (सोड मुंज सोडून) करण्यात येणार आहे. तसेच बटुसह पाच व्यक्तिंची भोजन व नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्तिंची भोजन व नाश्त्याची व्यवस्था प्रतिपान रु. ३२५/- जादा रक्कम भरुन करता येईल. कोणत्याही ब्राह्मण ज्ञातीतील गरीब / गरजु कुटुंबातील दोन बटुंचे संस्थेतर्फे व्रतबंध संस्कार मोफत करण्यात येतील. बाहेरगावांहुन येणाऱ्यांसाठी सशुल्क निवासाची व्यवस्था करण्यात येईल. कृपया इच्छुकांनी खालील दुरध्वनीवर अथवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक ग्रामीण तर्फे श्री शेखर कुलकर्णी (लासलगाव) यांनी केले आहे.शेखर कुलकर्णी संपर्क – ९६२३६९७४६७, संपर्क क्रमांक ०२५३-२५९६४३६, ९३७३०९६६८९, ९४२३९६७८९९ या नंबरवर साधावा.

Previous articleबीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
Next articleजीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची यशस्वी कामगिरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here