Home Breaking News 21 ला काँग्रेसचे सक्तवसुली संचनालय (ED) कार्यालय नागपूर येथे आंदोलन

21 ला काँग्रेसचे सक्तवसुली संचनालय (ED) कार्यालय नागपूर येथे आंदोलन

50
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220720-WA0008.jpg

 

21 ला काँग्रेसचे सक्तवसुली संचनालय (ED) कार्यालय नागपूर येथे आंदोलन

गडचिरोली:// केंद्रातील स्वायत्त संस्थाना हाताशी घेऊन त्यांना आपल्या परीने वागवण्याचा काम मागील अनेक वर्षापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकार करीत आहे.
जे जे सरकार विरोधात बोलतात, लिहितात सरकारला सत्य परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना खोट्या गुन्ह्यांच्या आधारावर दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे.
ED हे स्वायत्त संस्था असून दुजाभाव हेतूने व फक्त केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दिसते
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांना सुद्धा ED ने नोटीस दिली असून ED ची ही कार्यवाही भाजप च्या सांगण्यावरूनच होत असल्याचे दिसते याचा निषेध म्हणून काँग्रेस कमिटीच्या वतीने 21 जुलै रोजी ED कार्यालय नागपूर येथे सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे, तरी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मंडळी, सर्व सेल अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here