राजेंद्र पाटील राऊत
श्री सदगुरु नराशाम महाराज मठसंस्थान येवती येथे वार्षिक संजीवन समाधी काल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह महाआरती भंडारा यात्रा उत्सव रद्द (पौष महिना जत्रा)
नांदेड,/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड – मुखेड तालुक्यातील येवती येथील सदगुरु नराशाम महाराज मठसंस्थान येथे वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह महाआरती भंडारा यावर्षी साजरा केला जाणार नाही. कोरोना (covid-19) आजाराच्या पार्श्वभूमीवर मठात गर्दी होऊ नये म्हणून यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यातील येवती येथे सद्गुरु नराशाम महाराज यांची संजीवनी समाधी आहे. या मठात दरवर्षी श्रावण सप्ताह वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी सदगुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वार्षिक संजीवन समाधी काल महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सुमारे तीस ते चाळीस हजार भाविक भक्तगण उत्सवासाठी हजर राहतात. यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह मंगळवारी दि. 18 जानेवारी 2022 पासून सुरुवात होणार होता. देशात जागतिक स्तरावरील कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद म्हणून व भाविक भक्तांची गर्दी टाळावी म्हणून सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थानने यावर्षी वार्षिक संजीवन समाधी काल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह महाआरती भंडारा रद्द केला आहे(सप्ताह होणार नाही). यामुळे अखंड हरिनाम सप्ताह साठी भाविक भक्तांनी येवती येथे येण्याचे टाळावे व शासकीय नियमाचे पालन करून घरातच उत्सव साजरा करुन गुरुचे नामस्मरण करावे असे आवाहन मठ संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.