Home Breaking News पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर कारवाई करा – तय्यब कुरेशी पेठ...

पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर कारवाई करा – तय्यब कुरेशी पेठ वडगांव येथील सुयश लॅबोरेटरीच्याभोंगळ कारभारा विरोधात पुराव्यानिशी आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा

998
0

पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर कारवाई करा – तय्यब कुरेशी
पेठ वडगांव येथील सुयश लॅबोरेटरीच्याभोंगळ कारभारा विरोधात पुराव्यानिशी आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा

राहुल शिंदे कोल्हापूर  ब्युरो चिफ युवा मराठा न्युज 

चे वतीने हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ.उत्तम मदने यांना भेटून पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर कारवाई करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
भारतीय जनता पार्टी चे तय्यब कुरेशी यांचे कडे काही दिवसांपूर्वी सुयश लॅबच्या माध्यमातून चुकीचे रिपोर्ट दिले असलेची तक्रार आली, शुगर जास्त असल्याचा रिपोर्ट सुयश लॅब ने दिला आणि दुसरीकडे तपासणी करून घेतली असता सुयश लॅब आणि इतर लॅबच्या रिपोर्ट मद्धे फार तफावत असलेचे सांगितले असता तय्यब कुरेशी यांनी याची शहानिशा करणेसाठी एका वेळी दोन तीन जागी रक्त तपासणी करून शुगर तपासणी करून घेतली असता सुयश लॅब च्या माध्यमातून चुकीचे रिपोर्ट दिले जात असले चे निदर्शनास आले, चुकीचे रिपोर्ट मुळे उपचार ही चुकीच्या पद्धतीने होत आहे ,नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार सुयश लॅब च्या माध्यमातून होत असलेने आज तय्यब कुरेशी यांनी तात्काळ सुयश लॅब वर कारवाई करण्याची मागणी केली आहे व ज्यांनी ज्यांनी सुयश लॅब मद्धे शुगर तपासणी करून औषधोउपचार घेत आहेत त्यांनी पुन्हा एकदा शुगर तपासणी करून औषधोउपचार घ्यावा असे आवाहन केले आहे.
यावेळी विकास माळी पंचायत समिती सदस्य, रहीम मोमीन वडगांव शहर अध्यक्ष भाजपा अल्प मोर्चा ,नजीर कदीम, जावेद सय्यद,राहील पटवेगार,व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here