सलग विस दिवस पावसाचा खंड पडल्याने मुखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना सरसकट पिक विम्याच्या लाभ द्या : शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांची तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे मागणी..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यात सलग विस दिवस पावसाने खंड व ऊघडीप दिल्याने शेतकर्यांची शेतात पिके करपु लागल्याने मुखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना मदत जाहीर करा तसेच पिक विम्याचा शेतकर्यांना स्वतंञ्य लाभ द्यावा अशी मागणी शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे आजरोजी तहसिल कार्यालयात निवेदनाद्वारे केली.
तालुक्यातील शेतकरी सतत दुष्काळाने होरपळत असुन खरीप हंगामच्या सुरुवातीला अतिवृष्टी व ढगफुटी ने थैमान घालुन जमीनीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले असुन त्यात सलग विस पावसाचा खंड पडल्याने तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेञावरील पिके करपु लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असुन त्यामुळे मुखेड तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी ढोसणे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली.यावेळी त्याबरोबरच पिक विमा भरलेल्या इफको टोकीयो पिक विमा कंपनीला तात्काळ ऊत्पन आधारीत वर सरसकट पिक विमा देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी बालाजी पाटील ढोसणे यांनी केली.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंञी,पालकमंञी,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावेळी भारत देशमुख,पवण हराळे उपस्थित हौते.