Home उतर महाराष्ट्र “खूप सुंदर जेवण” भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंचा ‘मनसे’ दाद

“खूप सुंदर जेवण” भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंचा ‘मनसे’ दाद

75
0

राजेंद्र पाटील राऊत

“खूप सुंदर जेवण” भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंचा ‘मनसे’ दाद
✍️ विजय पवार कार्यकारी संपादक मुंबई युवा मराठा न्यूज

अहमदनगर -: मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून जेवणावर ताव मारला.
केडगाव येथील *मटण उकड* खाण्याची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना यावेळी ठाकरे यांनी बोलून दाखविली.
राज ठाकरे शनिवारी दुपारी केडगावमध्ये जेवणासाठी थांबणार असल्याची बातमी समजल्यानंतर पोलीस फौजफौटा नगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये दाखल झाला. केडगाव येथील हॉटेलमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांचे आगमन झाले.
त्यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर होते. नेहमीचा पांढरा शुभ्र कुरता आणि काळा गॉगल घालून राज ठाकरे केडगावमध्ये थांबले. त्यांच्यासाठी स्वंतत्र कक्षात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ठाकरे यांनी काळ्या मसाल्याचे मटण, बाजरीची भाकर व ताक असा आहार घेत मनसोक्त जेवण केले.
मनसेचे स्थानिक पदाधिकारी ठाकरे यांच्या भेटीबाबत अनभिज्ञ होते. ही त्यांची जेवणासाठी खासगी भेट असल्याचे त्यांच्यासोबत असणा-या मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. हॉटेलमधील  व्यवस्थापक सोडून त्यांनी जास्त कुणाशीही संवाद साधला नाही. त्यांचे छायाचित्र व सेल्फी काढण्यासाठी जमा झालेल्या त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी जवळ फिरकू दिले नाही.
खूप सुंदर जेवण असा शेरा मारीत त्यांनी केडगावचा निरोप घेतला.

Previous articleगोवंश तस्करी साठी नेत असताना जायखेडा पोलिसांची धडक कारवाई.
Next articleकोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे तपपूर्ती पर्व १९ ते २२ एप्रिलदरम्यान रंगणार; यंदाचा महोत्सव गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना समर्पित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here