Home नाशिक गोवंश तस्करी साठी नेत असताना जायखेडा पोलिसांची धडक कारवाई.

गोवंश तस्करी साठी नेत असताना जायखेडा पोलिसांची धडक कारवाई.

99
0

राजेंद्र पाटील राऊत

गोवंश तस्करी साठी नेत असताना जायखेडा पोलिसांची धडक कारवाई.
सुभाष रमेश अंकुशे सोमपूर युवा मराठा न्युज नेटवर्क
दिनांक 16. 4 .2022 रोजी जायखेडा पोलिसांनी गोवंशाच्या सुमारे 16 जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रकला पकडुन कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 12 चक्का ट्रक क्रमांक MH43U5389 ताहाराबाद कडून नामपूरकडे जात असल्याचे कळताच जायखेडा गावा नजीक देवीच्या मंदिराजवळ ट्रक पोलिसांनी साडेदहाच्या सुमारास मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतला. पोलीस स्टेशनच्या आवारात आणल्यानंतर ट्रक मधील साधारण १६ जनावरे गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी खाली उतरून घेतले. ट्रकमध्ये या जनावरांना अगदी खराब अवस्थेत कोंबून भरल्यामुळे बरेचसे जनावर अशक्त झालेली होती.येथील खासगी पशु वैद्यकीय डॉ.रुतीक जगताप यांनी या जनावर औषध उपचार केले. या कारवाईत एकूण गोवंशाची सोळा जनावरे व टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला असून अंदाजे हा सर्व मुद्देमाल 19 लाख 90 हजार रुपयांचा आहे. तसेच वाहन चालक मालक व सहकारी सय्यद जावेद सय्यद खलील रा. मालेगाव मोहम्मद मोहम्मद नियाज रा. मालेगाव यांच्यावर प्राणी सुधारणा अधिनियम 1995 चे 5 (ए) 5(बि) 9 (बि) प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याकामी जायखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधि साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाले असून, या वेळी पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार साळवे, पोलीस नाईक भगरे, पोलीस नाईक पाटील, पोलीस शिपाई पवार इ.कर्तव्यावर होते. पोलीस अधिकाऱ्यांचे या कार्यामुळे यांचे परिसरातून भरभरून कौतुक केले जात आहे.

Previous articleरामपूर(बोरी)येते हनुमान मूर्तिच्या प्रतिष्ठापणा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते
Next article“खूप सुंदर जेवण” भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंचा ‘मनसे’ दाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here