Home नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा अशोकराव चव्हाण यांची...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा अशोकराव चव्हाण यांची मागणी.

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20231212_083731.jpg

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा
अशोकराव चव्हाण यांची मागणी.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२३ राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.
वैद्यकीय संशोधन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत त्यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २ ऑक्टोबर रोजी २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत या रुग्णालयातील अव्यवस्थेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावेळी चव्हाण म्हणाले की, या रुग्णालयात एकूण ४६१ पदे मंजूर असून, त्यापैकी ११७ पदे रिक्त आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता, असा मंत्र्यांचा दावा आहे. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी बाहेरून औषधे आणावे लागत असल्याची तक्रार जाहीरपणे मांडली आहे. त्यादिवशी नवजात बालकांच्या अतिदक्षता केंद्रात एकावेळी ७० बालके दाखल होती. एका इन्क्युबेटरमध्ये तीन-तीन बालके ठेवण्यात आलेली होती. त्या ठिकाणी केवळ ३ परिचारिका कार्यरत होत्या. या रुग्णालयातील अनेक परिचारिकांची बदली झाली. मात्र, त्यांच्या रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. रुग्णालयात पुरेसे डॉक्टर्स देखील नाहीत. विविध वैद्यकीय चाचण्या करणारी उपकरणे कार्यरत नव्हती. रुग्णालयात नियमित स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी होती. सर्वसाधारणपणे राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांची व जिल्हा सामान्य रुग्णालयांची हीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने तातडीने पुरेशा निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. आरोग्य सेवा हा विषय गांभिर्याने व प्राधान्याने हाताळण्याची आवश्यकता आहे. रुग्णसेवेसाठी मोठी गुंतवणूक केली जाते. पदे रिक्त त्याचा योग्य उपयोग होणार नाही. घटना घडल्यानंतर मंत्री येतात, पालकमंत्री येतात आणि कालांतराने सारे शांत होते. हे टाळले पाहिजे व नांदेडसारख्या घटना राज्यात पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे, अशी भूमिका अशोकराव चव्हाण यांनी या चर्चेदरम्यान मांडली.

Previous articleनागपुरच्या हिवाळी अधिवेशनात देगलूर-बिलोलीच्या आमदारांना पडली गडचिरोलीच्या राईस मिल मधील गैर व्यवहाराची चिंता.
Next articleजिंतूर तालुक्यात चार युवकांना कुणबी प्रमाणपत्राचे वितरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here