Home परभणी जिंतूर तालुक्यात चार युवकांना कुणबी प्रमाणपत्राचे वितरण

जिंतूर तालुक्यात चार युवकांना कुणबी प्रमाणपत्राचे वितरण

910

आशाताई बच्छाव

IMG_20231212_084633.jpg

परभणी ,(शत्रूघ्न काकडे पाटील)                        मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. तालुक्यातील दहेगाव येथील चार मराठा तरुणांना सोमवारी दिनांक 11 डिसेंबर तहसीलदारांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सैराटी येथे अमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने 1967 पूर्वीच्या कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तालुक्यातील दहेगाव येथील गावातील नमुना नंबर 33 वर कुणबी असल्याची नोंदी आढळून आल्यामुळे गावातील तरुण रामा दत्तराव ढोणे, ज्ञानेश्वर देविदास ढोणे, तुकाराम देविदास ढोणे व ज्ञान मराठा युवक परमेश्वर ढोणे,दत्ता ढोणे, गणेश ढोणे, पांडुरंग ढोणे,मारोती ढोणे, गजानन ढोणे उपस्थित होते

Previous articleशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा अशोकराव चव्हाण यांची मागणी.
Next articleउज्वला गॅस योजनेची १० कोटी जोडण्या यशस्वी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.