Home वाशिम नवनिर्माण फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय ‘यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद महिला गटातून...

नवनिर्माण फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय ‘यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद महिला गटातून प्रथम पुरस्कार कु. कांचन सावंत, मुंबई पुरूष गटातून प्रथम पुरस्कार गोपाल पिपरैया, भोपाल (म.प्र.) यांनी पटकाविला

71
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_183509.jpg

नवनिर्माण फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय ‘यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
महिला गटातून प्रथम पुरस्कार कु. कांचन सावंत, मुंबई पुरूष गटातून प्रथम पुरस्कार गोपाल पिपरैया, भोपाल (म.प्र.) यांनी पटकाविला
वाशिम,,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ )– महान गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवार, २८ डिसेंबर रोजी स्थानिक स्वागत लॉन येथे नवनिर्माण फाऊंडेशन वाशिम तर्फे आयोजित ’यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील व इतर राज्यातून आलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच कार्यक्रमात महिला व पुरूष प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती.
स्पर्धेचे अध्यक्षपद आ. लखन मलिक तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक उत्तर प्रदेशचे माजी आमदार भोलाजी बढेल यांनी भूषविले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अशोक हेडा, राजु पाटील राजे, जेष्ठ समाजसेवक वसंतराव धाडवे, दिलीप जोशी, मिठु शर्मा, संजु आधारवाडे, राहुल तुपसांडे, अनिल केंदळे, भगत धामणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी आकोसकर यांनी तसेच सर्व प्रमुख मान्यवरांनी दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन केले. पर्धेत परिक्षक म्हणून दिनकर पांडे अमरावती, सुनिल वाघमारे नागपूर तसेच सौ. प्राची माडीवाले बुलढाणा यांनी उत्कृष्ट भूमिका पार पाडली.
स्पर्धेच्या प्रारंभी नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम बढेल व सर्व सदस्यांनी मिळून श्री श्री रविशंकर यांचे जय गुरू ओंकारा हे भजन गावून कार्यक्रमात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरणाची निर्मिती करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेमध्ये भर दे झोली मेरी या मोहम्मद, सांझ हो तुम आवाज तुम, मैं तेरे ईश्क में मर ना जाऊ, ये दिल तुम बिन कही लगता नही, तेरी आँखों के सिवा दुनिया में, रोशन तुम्ही से दुनिया, चिठीये पंख लगाके, कान में झुमका, कही दो कोई ना करे यहा प्यार असे अनेक दर्जेदार गीतांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
पुरूष गटातून स्पर्धेचे पहिले पारितोषिक २१००१ रू. गोपाल पिपरैया भोपाल, दुसरे पारितोषिक १५००१ रू. पियुष पाल चिंचोळकर आकोट, तिसरे पारितोषिक ११००१ रू. दिनेश धंजे अकोला यांनी पटकावले. महिला गटातून पहिले पारितोषिक २१००१ रू. कु. कांचन सावंत मुंबई, दुसरे पारितोषिक १५००१ रू. लाजरी भुरे नागपूर, तिसरे पारितोषिक ११००१ रू. सानिका बोभाटे वर्धा यांनी मिळविले. तर विशेष ज्युरी पुरस्कार ५००१ रू. कुर्बान शहा जळगांव, बेस्ट क्लासिकल पुरस्कार ५००१ रू. कु.श्रद्धा सपकाळ आकोट, लता मंगेशकर स्मृति पुरस्कार ५००१ रू. कु. सोनल पुरोहित खामगांव, श्रोते प्रोत्साहनपर पुरस्कार ५००१ रू. कु. गोदावरी गायकवाड जालना, तसेच विशेष वेशभूषा पुरस्कार ५००१ रू. ताहिरूद्दीन शहा वाशिम यांना प्रदान करण्यात आले. तसेच वाशिमच्या स्थानिक कलाकारांमधून व्हाईस ऑफ वाशिम पुरूष पारितोषिक ५००१ रू. विशाल दवंडे तर व्हाईस ऑफ महिला पुरस्कार ५००१ रू. आदिती काटेकर यांना देण्यात आला. तसेच दिव्यांग स्पर्धकांमधून प्रथम पुरस्कार ८००१ रू. सौ. पुजा शेंद्रे नाशिक, व्दितीय पुरस्कार ७००१ रू. प्रविण कठाळे पुसद, तृतीय पुरस्कार ६००१ रू. श्री अनिकेत खंडारे मुंबई यांना देण्यात आले.
या कार्यक्रमात बालगटात प्रथम पारितोषिक ७००१ रू. कु. स्वरा लाड यवतमाळ, व्दितीय पारितोषिक ६००१ रू. कु. वैदिशा शेरेकर अकोला तर तृतीय पारितोषिक ५००१ रू. कु. सत्यप्रिया श्रृंगारे वाशिम यांना प्रदान करण्यात आला. या पारितोषिका सोबत प्रमाणपत्र व विशेष शिल्ड देण्यात आले. तसेच स्पर्धेत प्रत्येक गटातून प्रथम आलेल्या स्पर्धकांना सौ. सुनिता नारायण मसरे यांच्याकडून स्व. निमिष नारायण मसरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तबला संच देण्यात आला. तसेच स्पर्धेत ११ स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमात वाद्यवृंदाची भूमिका नागपूरचे महेंद्र ढोले, कृष्णा जनवारे यांच्या संचने उत्कृष्टरित्या पार पाडली. कार्यक्रमाचे बक्षिस वितरण हुकुम तुर्के, वसंतराव धाडवे, मिठुभाऊ शर्मा, राहुलभाऊ तुपसांडे, संतोष वानखेडे, दिपकभांदुर्गे, रवि भांदुर्गे, अशोक हेडा, संजु आधारवाडे, राजु जानीवाले, उमेश मोहळे, प्रा. प्रशांत ठाकरे, इरफान कुरेशी, ताजु ठेकेदार, नितीन उलेमाले, अनिल केंदळे, सावनसिंह ठाकुर व वाशिमचे इतर गनमान्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासन व कपिल सारडा यांच्या सुरक्षा दलाने मोलाचे सहकार्य केले. तसेच संतोष जाधव, मामेडवार, ख्वाजा बागवान, वानखडे यांनी कार्यक्रमात आलेल्या सर्व स्पर्धकांसाठी तसेच आमंत्रित पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मारशेटवार यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्याम बढेल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम बढेल, मनोहर मानतकर, महादेव हरकळ, लक्ष्मण बढेल, एन.जी. मसरे, जितु बढेल, मनोज बढेल, तोताराम बढेल, रूपेश बढेल, रोहित बढेल, कमलेश हवेलिया, पवन शर्मा, सौ. सोनाली गावंडे (सावके), सौ. ज्योती इंगळे, सौ. वृषाली टेकाळे व सौ. अश्विनी अवताडे तसेच समस्त नवनिर्माण फाऊंडेशन ग्रुपने परिश्रम घेतले.

Previous articleशासनाने दिले आणि कंत्राटदार व अधिकाऱ्यांने खाले.ही घटना देगलूर तालुक्यातील करडखेड येथील आहे.     
Next articleअयोध्या पदयात्रेकरुचा शिरपूर येथे सत्कार व जंगी स्वागत आबा चौधरी मंडळाने केले आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here