Home नांदेड शासनाने दिले आणि कंत्राटदार व अधिकाऱ्यांने खाले.ही घटना देगलूर तालुक्यातील करडखेड येथील...

शासनाने दिले आणि कंत्राटदार व अधिकाऱ्यांने खाले.ही घटना देगलूर तालुक्यातील करडखेड येथील आहे.     

37
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_121342.jpg

शासनाने दिले आणि कंत्राटदार व अधिकाऱ्यांने खाले.ही घटना देगलूर तालुक्यातील करडखेड येथील आहे.                                                            नांदेड ( प्रतिनिधी संजय कोंकेवार) देगलूर तालुक्यातील करडखेड येथील मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना ही जवळपास 75 लाख रुपये आले असता,येथील पाणीपुरवठा शाखा अभियंता आर.के.राऊत व कंत्राटदार बालाजी नाईक व देगलूर येथील पंचायत समिती अधिकारी या सर्वांच्या मिलीभगत मुळे ही योजना थातूर-मातूर करून दिवसा गावकऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून रातोरात पाईपलाईन टाकले.व सकाळी ही बाब दत्तात्रय शिळवणे यांनी आपल्या शेतात नांगर मारण्यासाठी गेले असता,त्यांच्या नांगराला ही पाईपलाईन उकडून आली.हे पाहून त्यांनी चकित झाले.व आपल्या शेतातून रातोरात ही पाईपलाईन कशाची गेली आहे,ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिले.व गावकऱ्यांनी जाग्यावर जाऊन कामाची पाहणी केली असता,केवळ ही पाईप अक्षरशः कुठे एक फुटावर तर कुठे दीड फुटावर होते हे पाहूनही गावकऱ्यांनी चकित झाले.हे काम करीत असताना त्या कंत्राटदाराला व अधिकाऱ्याला एवढे सुद्धा लक्षात कसे आले नसेल,की या शेतीतून शेताची मशागत करते वेळी आपल्या कामाची पोलखोल होईल.याचे सुद्धा त्यांनाभान नव्हते.या कामाचा बोगस खोट्या एम बी रेकॉर्ड करून लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनात आले असून,हे बाब पाणीपुरवठा उपविभाग देगलूर येथील अधिकाऱ्यास पुराव्यासह करडखेड येथील गावकऱ्यांनी निवेदन देऊनही,सांगूनही येथील अधिकाऱ्यांनी उडवा-उडवी चे उत्तरे देत होते.केवळ हे प्रकरण दडपण्याचे काम करीत असल्यामुळे मुडदाड प्रशासनाला,झोपेचं सोंग घेऊन पाहणाऱ्या येथील अधिकारी व शासनाला जाग येण्यासाठी करडखेड येथील गावकऱ्यांनी पंचायत समिती देगलूर येथे आमरण उपोषणास बसले आहेत.या जिल्ह्यात मुख्यमंत्री पेजल योजनेचे भ्रष्टाचाराचे जाळे असून,यामागे मुख्य सूत्रधार आहे तरी कोण? हे पाहणे महत्त्वाचे आहे. या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे करडखेड हे गाव पाण्यापासून वंचित आहे.या गावात खूप मोठं तलाव असून,पिण्याच्या पाण्यासाठी दोन दिवसात आड पाणी येतो.”धरण उशाला कोरड घशाला”अशी अवस्था या गावची आहे.यावर चौकशी समिती गठीत करून या अशा अधिकाऱ्यावर व कंत्राट दारावर फौजदारीचा गुन्हा दाखल करावा.व कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करावे.अशी गावकऱ्यांची मागणी आहे.या निवेदनामध्ये करडखेड येथिल आर टी आय कार्यकर्ता किशन पांचाळ,श्रीनिवास मंदिलवार,हणमंत चिनगुलवार,व्यंकट गोणेवार,गणपत शिळवणे,अशोक कोकणे,दीपक पाटील,सुरेश चिटकुलवार(सावकार),दिगंबर कोकणे,शेख फयाज,अरविंद गडपवार या आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.या प्रकरणावर शासनाने अधिकारी,कंत्राटदारावर योग्य कारवाई होईल का?यावर संपूर्ण देगलूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here