Home भंडारा प्रेसिडेन्ट कप २.० विदर्भ इंटर-डिस्ट्रिक राज्यस्तरीय सिनिअर पुरुष हॉकी स्पर्धेचा दिमागदार सोहळा...

प्रेसिडेन्ट कप २.० विदर्भ इंटर-डिस्ट्रिक राज्यस्तरीय सिनिअर पुरुष हॉकी स्पर्धेचा दिमागदार सोहळा संपन्न

48
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-185615_WhatsApp.jpg

प्रेसिडेन्ट कप २.० विदर्भ इंटर-डिस्ट्रिक राज्यस्तरीय सिनिअर पुरुष हॉकी स्पर्धेचा दिमागदार सोहळा संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ): जिल्हा हॉकी असोसिएशन भंडारा च्यावतीने अध्यक्ष चषक २.० विदर्भ आंतरजिल्हा राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन पोलीस मुख्यालय मैदान भंडारा येथे करण्यात आले होते. त्यात नागपूर व भंडारा संघात रोमांचक सामना झाला. व शेवटच्या मिनिटांत नागपूर संघाने बाजी मारत यश संपादन करून प्रेसिडेन्ट कपाचे मानकरी झाले आहेत.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेनीक्वाईट अशोसिएसनचे अध्यक्ष एड. मधुकांत बांडेबुचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुरूप्रीत सिंग, भंडारा जिल्हा कुस्तिगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास शहारे, क्रिष्णा जोशी, सामाजिक कार्यकर्ते शिवा आजबले, क्रिष्णा उपरिकर, विलास केजरकर, शरद नखाते, भंडारा जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत ईलमे, किशोर जिचकार, श्यामू बांते, हरिश कपूर, किशोर गोंडाणे, तालेवार सर, सतीश फुलसुंगे, विवेक सिरीमा, गोपाल वैदय, आर्चरी असोशिएशनचे सचिव आशिक चुटे, शिल्पा सेलोकर, अमोल कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ आंतरजिल्हा राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा येथील संघानी सहभाग घेतला होता.
नागपुर, भंडारा व वाशिम येथील हॉकी संघाने अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे. त्यांना ट्राफी व मेडल देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यावेळी तलवारबाजी आंतरराष्ट्रिय खेळाडु शोहेब अन्सारी व वेस्ट बंगाल येथील स्पर्धेत भारताला कास्य पदक मिळवून देणारे भंडारा येथील खेळाडू ऋषभ गुप्ता व उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व फुलांचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आले.
त्याबरोबर हॉकी स्पर्धेत बेस्ट गोलकिपर आयुश बान्ते, बेस्ट प्लेअर मोहित कटोते, बेस्ट फारवड करण ठोसरे व बेस्ट डिफेंडर म्हणून तुषार गायधने यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
आंतर जिल्हा ज्युनिअर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा दिनांक २२ ते २४ नोंव्हेबर २०२३ ला नागपूर येथे होणार आहे. अशी माहिती त्यावेळी मान्यवरांकडून देण्यात आली. तसेच हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या संघाचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन टेनीक्वाईट अशोसिएसनचे अध्यक्ष एड. मधुकांत बांडेबुचे यांनी केले.
प्रेसिडेन्ट कप २.० विदर्भ इंटर-डिस्ट्रिक राज्यस्तरीय सिनिअर पुरुष हॉकी स्पर्धेचा फाईनल नागपूर व भंडारा हॉकी संघात अटाटतीचा सामना रंगत असतांना सारख्या गुणांकावर होते. मात्र एका मिनिटात नागपूर संघाने गोल करून विजय संपादन केला आहे. हा सामना पाहण्यासाठी हौशी खेळाडू बरोबर नागरिकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे व प्रास्ताविक भंडारा जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तलवारबाजी अशोसिएशनचे अध्यक्ष सुनील कुरंजेकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
प्रशांत शेंडे, कुणाल गभणे, अमोल खराबे, सागर भोंडे, राजेंद्र पिल्लारे, अरूण रेवतकर, कुणाल मेश्राम,
पल्लवी गोंडाणे, श्रमिष्टा गोडबोले, वैशाली चिचुलकर, शितल नरबरिया, जिल्हा हॉकी असोसिएशन व जिल्ह्यातील क्रिडा असोसिएशनच्या पदाधिकारीव खेळांडूंनी सहकार्य केले.

Previous articleउद्या शनिवारी दारु दुकाने राहणार बंद जिल्हाधिका-यांचे आदेश
Next articleपथकर नाक्यांवरील सुविधांची उद्यापासून पाहणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here