Home नाशिक मालेगांव पंचायत समितीच्या गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन

मालेगांव पंचायत समितीच्या गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन

158

आशाताई बच्छाव

20230926_064727-BlendCollage.jpg

मालेगांव पंचायत समितीच्या गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन                                 (प्रतिनिधी आंशूराज पाटील -राऊत)
मालेगांव-येथील पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्थापना केलेल्या गणरायांचे काल सातव्या दिवशी उत्साहात विसर्जन करण्यात आले.
प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पांची स्थापना केली होती.अत्यंत उत्साही वातावरणात दररोज पुजाअर्चा व आरती करण्यासोबतच बाप्पांची मनोभावे आराधना केली जात होती.काल सातव्या दिवशी पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.महाप्रसादाचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांसह ग्रामीण भागातून कामासाठी आलेल्या नागरीकांनी घेतला.तर सायंकाळी गणरायांचे अत्यंत उत्साही वातावरणात “गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.यावेळी पंचायत समितीच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी मनमुराद नाचून बाप्पाला अखेरचा निरोप दिला.गटविकास अधिकारी भरत वेंदे आणि वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी या मिरवणूकीत सहभाग घेतला त्यामुळे काही काळ पंचायत समितीला धार्मिक स्वरुप प्राप्त झाले होते.

Previous articleम्हसदीच्या आदर्श विद्यालयाच्या गणरायांचे सातव्या दिवशी उत्साहात विसर्जन
Next articleलामकाणी ग्रां.प उपसरपंच पदी पवार यांची निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.