Home बुलढाणा 7 वर्षीय अलिना ने ठेवला मोठा रोजा

7 वर्षीय अलिना ने ठेवला मोठा रोजा

29
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220429-WA0002.jpg

7 वर्षीय अलिना ने ठेवला मोठा रोजा

संग्रामपूर प्रतिनिधी /रविंद्र शिरस्कार युवा मराठा न्युज नेटवर्क
ईस्लाम धर्मात पवित्र माहे रमजान मध्ये प्रत्येक सज्ञान व्यक्तीस स्त्री पुरुषाना उपवास (रोजा) ठेवणे अनिवार्य असल्याने मध्यरात्री खान पान करून सुर्य मावळल्यानंतर उपवास सोडावे लागते १ महिणाभर उपवास ठेवणे अनिवार्य असल्याने सज्ञान स्त्री पुरुष वृद्ध दैनदिन महिणाभर उपवास ठेवतात २६ वा उपवास सर्वात मोठा असल्याने अन्यसाधारण महत्व आहे याच दिवशी संपुर्ण रात्र प्रेषीत यांच्या शिकवणी प्रमाणे एकेश्वर समोर नतमस्तक होऊन ईश्वर कडे झोकुन रात्रभर मस्जीद मध्ये प्रार्थना करतात.
तालुक्यातील वरवट बकाल येथील पत्रकार शेख अनिस यांची 7 वर्षीय अलिना सहेर या चिमुकली ने आज दि. 29 एप्रिल रोजी 26 वा रोजा (उपवास) ठेवला.
मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना हा पवित्र महिना मानला जातो. दर वर्षी 10 ते 12 दिवस आधी म्हणजे मागच्या वर्षीच्या 12 दिवस आधी हा महिना येत असून या वर्षी 3 एप्रिलला पहिला उपवास आला. या वर्षीचे तापमान 42 अंशाच्या वर असून या रखरखत्या उन्हात 7 वर्षीय अलिना ने पहाटे 4:30 वाजता सहेरी करून सायंकाळी 6:50 वाजता उपवास सोडला असून एकूण 14 तासाचा उपवास अलिना ने ठेवला आहे. अलिना सहेर शेख अनिस याचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here