Home Breaking News *साप्ताहिक युवा मराठा* *वृतपत्रांच्या वार्षिक वर्गणीदार* *मोहिमेचा शुभारंभ*

*साप्ताहिक युवा मराठा* *वृतपत्रांच्या वार्षिक वर्गणीदार* *मोहिमेचा शुभारंभ*

112
0

*साप्ताहिक युवा मराठा*
*वृतपत्रांच्या वार्षिक वर्गणीदार*
*मोहिमेचा शुभारंभ*
सटाणा,( जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-*शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर लक्ष्मीपुजन दिनी रोजी दुपारी बारा वाजता साप्ताहिक युवा मराठा वृतपत्रांच्या वर्धापन दिन व दिवाळी अंकाचे प्रकाशन नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातल्या सुप्रसिद्ध सिध्दीविनायक गणेश मंदीरात ठेंगोडा येथे उत्साहात पार पडले.यावेळी मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,सटाणा तालुका प्रतिनिधी जयवंत धांडे, व संदीप धोंडगेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.*
आणि वार्षिक वर्गणीदार
*मोहिमेचा झाला शुभारंभ*
*युवा मराठा परिवाराने सदैव अठरा पगड जातीधर्माच्या लोकांना व बारा बलुतेदारांना सोबत घेऊनच आपली वाटचाल चालू ठेवलेली आहे,आणि म्हणूनच आज लक्ष्मीपुजन दिनी युवा मराठा वृतपत्र व चँनलचे एक चाहते सटाणा येथून थेट ठेगोंडा येथे आलेत.व युवा मराठा परिवाराचे कौतुक करण्याबरोबरच स्वतः मुस्लीम असूनही शफी बशीरखाँ पठाण यांनी युवा मराठा वृतपत्रांच्या वार्षिक वर्गणीदार मोहिमेचा सर्वप्रथम सभासद होण्याचा बहुमान मिळवत ४९९/- रुपये वर्गणी देण्याबरोबरच सटाणा तालुक्यातून युवा मराठा साठी योगदान देण्याचे जाहिर केले.पठाण यांच्या कामगिरीला युवा मराठाचा सलाम!*
*पालघरमध्येही शुभारंभ* *युवा मराठा न्युजचे ठाणे-पालघर जिल्हा ब्युरो चीफ वैभव हरेश्वर पाटील यांनी आजपासून साप्ताहिक युवा मराठा वृतपत्रांच्या वार्षिक वर्गणीदार सभासद नोंदणीला प्रारंभ केला असून,विश्वनाथ भिमा पाटील यांना प्रथम वर्गणीदार बनवून आपल्या कार्याचा श्रीगणेशा वैभव पाटील यांनी केला आहे.त्यांचेही युवा मराठा परिवाराकडून अभिनंदन!*
*युवा मराठा न्युज आता*
*सटाण्यातही दिसणार केबल टि.व्ही,वर* *युवा मराठा न्युज चँनलच्या बातम्या आता मालेगांव नंतर सटाणा शहर व तालुक्यात लवकरच केबल टि.व्ही.वर बघण्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे.त्याबाबतची बैठकही आज सटाणा येथे पार पडली.लवकरच सटाणावासियांच्या सेवेत युवा मराठाच्या बातम्या थेट टि. व्ही.वर बघण्याची सुवर्णसंधी यानिमिताने उपलब्ध होत आहे.* *युवा मराठा न्युज या साप्ताहिक अंकाचे धुमधडाक्यात प्रकाशन*

*आज युवा मराठा न्युज या व्रुत्तपत्रांच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने श्री सिध्दीविनायक गणपती बाप्पांच्या क्रुपा आशिर्वादाने लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधुन श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर ठेगोंडा येथे युवा मराठा न्युज या साप्ताहिक अंकाचे धुमधडाक्यात प्रकाशन करण्यात आले*
*या प्रसंगी युवा मराठा न्युज पोर्टल वेबसाईट सोशल मिडियाचे संपादक श्री राजेंद्र राऊत पाटील यांनी व जेष्ट पत्रकार श्री जयवंत धांडे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले यावेळी श्री जयवंत धांडे यांनी या साप्ताहिक अंकाची माहिती देतांना सांगितले की युवा मराठा न्युज हे बातमी पत्र आठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन निर्भिडपणे बातमी प्रसारित करून न्याय मिळवून देणारे व्रुत्तपत्र आहे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे व्रुत्तपत्र आहे तसेच मोबाईल युट्यूब वर बातम्या प्रसारित केल्या जातात यापुढे बागलाण तालुक्यातील दुरदर्शन वर सर्व बातम्या प्रसारित केल्या जातील हा साप्ताहिक न्युज पेपर सभासद यांना पोस्टल द्वारे पुर्ण वर्षभर घरपोच मिळेल तसेच विशेष पुरवणी सुध्दा वीणामुल्य मिळेल प्रत्येक सभासद यांना एक जाहिरात विनामूल्य देता येईल त्यासाठी वार्षिक सभासद फी फक्त ४९९/- रुपये आहे आणि या प्रसंगी आमचे पहिले सभासद श्री शफी बशीरखा पठाण सटाणा हे झाले त्यामुळे युवा मराठा न्यूज हे सर्व जातीधर्माच्या लोकांचे एकतेचे प्रतीक आहे हे आम्ही सिद्ध केले आम्हाला यापुढेही आमचे मित्र हितचिंतक व सर्व ग्रामस्थ भरभरून प्रतिसाद देतील व भविष्यात नबंर एक चे व्रुत्तपत्र असेल व आमच्या व्रुत्तपत्रातून योग्य ती पडताळणी करून निर्भिडपणे बातमी च्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी सोडवता येतील व व योग्य तो न्याय मिळेल यात शंका नाही*

* मुख्य संपादक श्री राजेंद्र राउत पाटील*

*जेष्ट पत्रकार श्री जयवंत धांडे ठेगोंडा*

Previous articleअखेर राज्यातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे उद्यापासून सुरु करण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा निर्णय
Next articleमहालक्ष्मी मंदिर उद्या पासुन दर्शनासाठी राहणार खुले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here