Home नाशिक देवळात तुळजाई आँटोमोबाईल्स दुकानाला भीषण आग

देवळात तुळजाई आँटोमोबाईल्स दुकानाला भीषण आग

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240326_083349.jpg

देवळा तालुका प्रतिनिधी भिला आहेर :- येथील देवळा कळवण रोडवरील तुळजाई आटोमोबाईल्स ह्या दुकानाला आजरात्री ठीक आठ वाजेच्या सुमारास शॉट सर्किट मुळे आग लागली .या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले .देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी दि २६ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळे यांच्या तुळजाई आटो मोबाईल्स ह्या दुकानाला शॉट सर्किट मुळे आग लागली. ह्यात स्पेअर पार्ट, ऑइल, फर्निचर, कम्प्युटर ,सीसीटीव्ही कॅमेरे, महत्त्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाले .यामुळे शेवाळे यांचे जवळपास 56 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .ह्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सम्पूर्ण ऑईल सह ,लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली .यावेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली . दुकानात विक्रीसाठी ऑईलअसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते . घटनास्थळी तलाठी उमेश गोप नारायण यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला . आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेवाळे यांनी सांगितले असून ,भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Previous articleभावनांचे विश्व
Next articleनाशिकच्या भगूरमध्ये धुलीवंदन निमित्त वीरांची मिरवणूक उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here