Home नाशिक नाशिकच्या भगूरमध्ये धुलीवंदन निमित्त वीरांची मिरवणूक उत्साहात संपन्न

नाशिकच्या भगूरमध्ये धुलीवंदन निमित्त वीरांची मिरवणूक उत्साहात संपन्न

65
0

आशाताई बच्छाव

IMG_20240326_084227.jpg

भगुर प्रतिनिधी सुदर्शन बर्वे
– नाशिक ही संतांची भूमी असुन या ठिकाणी प्रभु श्रीरामचंद्र यांचे चरणस्पर्श झाला आहे त्यामुळे या ठिकाणी अद्भुत असा देवभूमीचा वास असल्याचे जाणवते
गेले ३०० ते ४०० वर्षांपासून भगुर या गावात धुलीवंदन निमित्त वीर नाचवण्याची परंपरा आहे ही परंपरा फार जुन्या काळापासून भगुर या गावात सुरू आहे यात प्रामुख्याने तरुण पिढी आणि वयोवृद्ध तसेच लहान मुल सुध्दा यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात विविध प्रकारच्या वेशभूषा करून हि मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढली जाते यात संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात यात नागरिक होळीची राख एकमेकांवर उधळण केली जाते यात प्रामुख्याने १वर्ष ते १० वर्ष वयोगटातील मुलांना कोणी कृष्ण तर कोणी धोतर, सदरा, फेटे घालून सजवतात आणि मोठया थाटामाटात पारंपारिक पद्धतीने गावभर मिरवणूक काढून आजच्या दिवशी म्हणजे धूलिवंदन ला दरवर्षी मिरवतात
थोडक्यात वीर म्हणजे आपले कुटुंबीयातील पुर्वज असतात जे देवघरामध्ये एका चांदिच्या टाक स्वरूपात असतात

Previous articleदेवळात तुळजाई आँटोमोबाईल्स दुकानाला भीषण आग
Next articleविद्यार्थी आत्मविश्वास दिन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here