Home सामाजिक भावनांचे विश्व

भावनांचे विश्व

135
0

आशाताई बच्छाव

IMG_20240325_152501.jpg

भावनांचे विश्व

माणसाचे जीवन भावनांवर अवलंबून असते.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणूस भावनांमध्ये गुरफटलेला असतो.भावनांचे अनेक पैलू आहेत.जसे राग, द्वेष, आक्रोश,दया,माया,दु:ख इत्यादी.स्थळ आणि काळानुसार माणसाच्या भावना बदलत असतात.भावनांचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्या घातक ठरू लागतात.प्रेमाचा अतिरेक झाला की माणूस जीव घेण्यापासून ते जीव देण्यापर्यंत मजल गाठू शकतो.राग, द्वेष या भावनांचा अतिरेक झाला की माणूस दुसऱ्या माणसाचा तिरस्कार करू लागतो.रागात एकमेकांबद्दल असलेल्या आदर, प्रेम या भावनांना तिलांजली दिली जाते.म्हणजेच यात प्रेमाचा नाश होतो.मनातला क्रोध संपला की माणसाच्या मनात जी रिकामी पोकळी निर्माण होते ती म्हणजे शांतता.
माणसाच्या भावना वेळेनुसार, काळानुसार बदलत राहतात.एखाद्या व्यक्तीची एखाद्याबद्दल आज असलेली भावना उद्या देखील तशीच राहिल असे अजिबात नाही.माणसाच्या भावनांवर आजूबाजूच्या परिस्थितीचाही परिणाम होतो.भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, ध्यान या गोष्टींची मदत घेऊ शकतो.भावनांच्या आहारी न जाता त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.खरे सांगायचे तर,जीवनास उपयोगी आणि जीवनास घातक अशा मनुष्याच्या मुख्य दोन भावना आहेत.भावना सुखद किंवा दुखद असते.भावना म्हणजे आपल्या कृतीतून किंवा बोलण्यातून उतरणारे हावभाव.माणसाचे जीवन म्हणजे भावनांचा खेळ.प्रत्येकालाच चांगल्या-वाईट भावना असतात.कधीकधी भावना गोठल्याचेही जाणवतं.एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तीची मदत न करता हल्ली लोक त्या व्यक्तीचे व्हिडिओ काढत बसतात.काय म्हणावे याला? अशावेळी लोकांच्या भावना शून्य झाल्याची जाणीव होते.कधीकधी आपण इतरांकडून खूप अपेक्षा करतो.अवास्तव अपेक्षा ठेवल्या की अनेकदा अपेक्षाभंगाचे दु:ख सोसावे लागते.काही घरातील लोक एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत नाही.अशावेळी एकमेकांबद्दल असलेल्या भावना कळत नाही.सहाजिकच एकमेकांमधील दूरी वाढत जाते.यामुळे अव्यक्त भावना मनात साठत जाऊन अखेर बोथट होतात.माणूस बुध्दीजीवी प्राणी आहे.पण कधीकधी बुध्दीचा वापर न करता भावनांच्या आहारी जातो आणि मनमर्जीनुसार वाट्टेल तसे वागतो.यातूनच समाजात चोरी,खून,हिंसा, बलात्कार यांसारख्या घटना घडतात.आपल्याकडे जे नाही ते दुसऱ्याकडे पाहून माणसाला त्याच्या हेवा वाटतो.
” नको रे मना मत्सरू दंभ भारू”
असा उपदेश स्वामी समर्थांनी केलेला आहे.काही माणसं मनात दु:ख लपवून ठेवून चेह-यावर हसू ठेवतात.पण ते आतल्याआत खचून गेलेले असतात.अशावेळी त्यांना प्रेमाची गरज असते.प्रेममय भावनेतूनच आपण दुसऱ्यांच्या चेह-यावर हसू फुलवू शकतो.नेहमी सकारात्मक विचार केला तर आपल्या भावना नेहमी सकारात्मकच असतील.त्यामुळे आपल्या भावनांवर संतुलन राखून योग्य निर्णय घेणं आवश्यक असते.कुणी कसं वागायचं, कुणाबद्दल काय भावना ठेवायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.भावना फुकट असल्या तरी त्यांना आवर घालणे तितकेच महत्त्वाचे आहे.तेव्हाच आपल्याला चांगले-वाईट याचा बोध होईल.भावना माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवू शकतात,तसेच उध्वस्तही करू शकतात.आपल्या भावना दुसऱ्यावर न लादता नियंत्रण ठेवावे.यासाठी स्वतःला आपल्या आवडत्या कामात गुंतवून घेणे हा सोपा उपाय आहे.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleख्रिस्ती बांधवांनी रविवारी झावळ्यांचा रविवार अर्थातच‘पाम संडे’साजरा केला
Next articleदेवळात तुळजाई आँटोमोबाईल्स दुकानाला भीषण आग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here