Home माझं गाव माझं गा-हाणं पालघरमध्ये गणेशोत्सव मंडळाने साकारली जिल्हा मुख्यालयाची प्रतिकृती           ...

पालघरमध्ये गणेशोत्सव मंडळाने साकारली जिल्हा मुख्यालयाची प्रतिकृती                                 

107
0

राजेंद्र पाटील राऊत

पालघरमध्ये गणेशोत्सव मंडळाने साकारली जिल्हा मुख्यालयाची प्रतिकृती                                                         पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज)
प्रतिकृती साकारण्यासाठी औद्योगिक टाकाऊ वस्तूंचे केले वापर
गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वर्षभर वाट पाहिली जाते.करोनाचा सावट जरी असला तरीही गणेशभक्तांचा उत्साह जराही कमी झालेला नाही.यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमी पुढे असतो,गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच गणरायाची व गणरायाच्या सजावटी साठी मंडपात विविध प्रकारची आकृती देखावा साठी गणेशोत्सव मंडळाकडून मोठी रकम देखील खर्च केली जाते.

परंतु पालघर शहरातील गोठणपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी गणरायाच्या मंडपात जिल्हा मुख्यालयाची प्रतिकृती साकारली आहे,विशेष म्हणजे यासाठी कुठलीही मोठी रकम खर्च न करता हे प्रतिकृती साकारण्यासाठी पालघर शहरातील वेगवेगळ्या औद्योगिक कारखान्यातील टाकाऊ(भंगार) वस्तूंचे वापर करण्यात आले आहे.ज्यात औषध कंपनीतुन टाकाऊ स्वरूपात निघणाऱ्या गोळ्यांची पेकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीव्हीसी फॉईलचे टाकाऊ वस्तू,इतर कारखान्यात उत्पादनाची पेकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलचे टाकाऊ भाग,धागा कारखान्यातून निघणाऱ्या धाग्यांचे रिकामी रोल व अश्या अनेक टाकाऊ वस्तू पासून या पालघर जिल्हा मुख्यालयाची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

पालघर जिल्हा मुख्यालय देशात सर्वात मोठे आणि सुसज्ज असे जिल्हा मुख्यालय समजले जाते,म्हणून सम्पूर्ण पालघर शहरात या देखावा प्रतिकृतीची जोरदार चर्चा सुरू असून या जिल्हा मुख्यालय देखावा प्रतिकृती साकारणाऱ्या गोठणपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व तरुण सदस्यांचे शहरभर कौतुक केले जात आहे.या औद्योगिक टाकाऊ वस्तूंपासून पालघर जिल्हा मुख्यालयाची प्रतिकृती साकारणाऱ्या मंडळातील तरुणांमध्ये मंडळाचे अध्यक्ष दिनेश पांडुरंग बाबर,सचिव सूरज पांडुरंग बाबर,चंद्रकांत रिंजड,अनंता बाबर,अनिल धोडी,रफीक मुनाफ मेमन,सचिन काटेला,मंगेश नाईक, मंगेश बाबर, रिफाक मुनाफ मेमन,राकेश पराड,हर्षद राठोड तसेच अनेक युवा तरुणांचा उल्लेखनीय योगदान होता.

Previous articleपेरू नदीकाठावर असलेल्या कलंबर (दे) येथील नदीवर पूल बांधून देण्याची निवेदनाद्वारे मागणी.
Next articleपंजाबराव डख हवामान तज्ञ यांनी दहेगाव शिवारातील शेतकर्यांना केले मार्गदर्शन                   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here