Home सोलापूर सोलापुर जिल्हयातील दुध उत्पादकांच्या प्रश्नांची तातडीने सोडविण्याची मागणी 

सोलापुर जिल्हयातील दुध उत्पादकांच्या प्रश्नांची तातडीने सोडविण्याची मागणी 

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20231123_055518.jpg

सोलापुर जिल्हयातील दुध उत्पादकांच्या प्रश्नांची तातडीने सोडविण्याची मागणी
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल ब्युरो चीफ महादेव घोलप

सोलापूर

राज्यातील गाईच्या व म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रचंड
मोठया प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा दुध व्यवसाय अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च
आणि दुधाचा भाव याच्या मध्ये खुप मोठी तफावत असल्याने दुधा धंदा सध्या शेतकऱ्यांना नुकसान
कारक ठरत आहे. सध्या दुधाला 3/5 फॅट व 8/5 एस एन एफ प्रति लिटर 25 ते 28 रुपये पर्यंत कमी
दर मिळत आहे. परंतु जुलै 2023 मध्ये शासन निर्णयनुसार 34 रुपये प्रति लिटर दुध दर देणे
बंधनकारक असताना. सरकारने ठरवुन दिलेल्या दरपत्रकाला केराची टोपली दाखवत खाजगी व सहकारी
दुध संघानी 25 ते 28 रुपये दराने दुध खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे सोलापुर जिल्यातील दुध
उत्पादक शेतकरी अर्थिक विवंचनेत सापडला आहे. तरी सोलापुर जिल्ह्यातील दुध उत्पादक
शेतक-यांच्या मागण्या खालील प्रमाणे
1). 3/5 फॅट व 8/5 एस एन एफ प्रति लीटर 34 रुपये दराचा हमीभाव प्रत्येक दुध उत्पादक शेतक-याला मिळालाच पाहीजे. 2. पशुखादयांचे वाढलेल्या दरावर नियंत्रण ठेवुन 30 टक्याने दर कमी केले पाहीजेत.
3. राज्याबाहेरील डोडला, हॅटसन व अमोल या संघाचा दुध खरेदी दर 29 ते 32 रुपये पर्यंत मिळतो व
महाराष्ट्रातील नामांकित सोनाई, नेचर यासह काही संघाचा दुध खरेदी दर 26 रुपया पर्यंत खाली आला आहे. यातील हमी भावासहीत तफावतीची रक्कम शेतक-यांच्या बैंक खात्यात तातडीने जमा करण्यात यावी.
4. दुधाला प्रति लिटर 8 रुपये अनुदान देऊन शेतकयांच्या बैंक खात्यात जमा करण्यात यावे.
5. दुधाचे रिव्हर्स (कमीपत) 1 पॉईटला 1 रुपया कमी दरा ऐवजी 20 पैसे प्रति लिटर कमी दर करण्यात यावा.
6. दुध भेसळ करण्याऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन दुध संघ, दुध संस्था काळ्या यादीत टाकण्यात याव्यात.
7. दुध संकलन करणाऱ्या संकलन केन्द्र चालकाला प्रति लिटर 2 रुपये कमिशन देण्यात यावे. 8. दुधाळ जनावरांचा 1 रुपया मध्ये पशुविमा काढण्यात यावा.
9. दूध गुणवत्ता तपासणी यंत्र (लॅक्टो मिटर) सरकार कडुन प्रमाणित करून देण्यात यावेत. 10. दुधामधिल भेसळ रोखण्यासाठी भेसळ प्रतिबंधक अधिका-यांची पथके नेमुन दूध भेसळ नियंत्रणात आणावी.
11. लम्पी रोगाने मुत्यु पावलेल्या जनावरांचा पशु विमा अदयाप पर्यंत ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्याना पशु विमा तातडीने मिळण्यात यावा.
वरील सर्व दुध उत्पादक शेतकऱ्याच्या मागण्यांचा गाभिर्यपूर्वक विचार करून तातडीने दुध दर वाढवुन वरील
प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी केली आली आहे

Previous articleतरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार.. मेहुणबारे पोलीस स्टेशन ला एकावर गुन्हा
Next articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर शिंगारे यांची नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here