Home नांदेड शेतकऱ्यांना नविन पिककर्ज मंजूर करा शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड उठवा अन्यथा आंदोलन. भागवत...

शेतकऱ्यांना नविन पिककर्ज मंजूर करा शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड उठवा अन्यथा आंदोलन. भागवत पाटील सोमूरकर

122

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0057.jpg

शेतकऱ्यांना नविन पिककर्ज मंजूर करा शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड उठवा अन्यथा आंदोलन. भागवत पाटील सोमूरकर
.नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
. . नांदेड (देगलूर): देगलूर तालुक्यात सद्या शेतकरी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे संकटात सापडला असून शेतकऱ्यांना नविन पिकर्कज मंजूर करण्यात बँक टाळाटाळ करत असून शेतकऱ्याला वेठीस धरून नाहक त्रास दिला जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे खाते पेंडीग आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान योजना व दुष्काळ व पीक विम्याचे पैसे या खात्यावर पडत असल्यामुळे जाणून बुजून बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना फवारणीसाठी मशागतीसाठी लागणाऱ्या पैशाची अडचण होत असल्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असताना दिसत आहे म्हणून अशा बँक अधिकाऱ्यांमुळे शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे एकीकडे शासन शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी जनजागरण करत आहे दुसरीकडे बँक अधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असताना दिसत आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे ते तात्काळ काढून शेतक-यांचे खाते पुर्ववत चालू करण्यात यावे. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवा सेने च्या वतीने तीव्र आंदोलन व बँके समोर उपोषण करण्यात येईल या दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार बँकचे शाखाधिकारी राहतील असे निवेदन युवा सेना देगलूर तालुका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर बँक अधिकाऱ्यांना निवेदना मार्फत देण्यात आले. त्यावेळी शिवसेना विभागप्रमुख हणेगाव, दिलीप ईनामदार , युवासेना तालुका प्रमुख समन्वयक , भागवत पाटील सोमूरकर, राजू पाटील रमतापूर, लक्ष्मण पाटील मानुरकर यावेळी उपस्थित होते

Previous articleनाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी बालकांना साहित्य वाटप
Next articleदेशभरातून आणलेल्या पवित्र मातीच्या मंगल कलशांचे वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजन 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.