• Home
  • 🛑 *नियम पाळा अन्यथा कोरोनाची दुसरी लाट….!टास्क फोर्सच्या सदस्य मनिषा म्हैसकर यांचा इशारा* 🛑

🛑 *नियम पाळा अन्यथा कोरोनाची दुसरी लाट….!टास्क फोर्सच्या सदस्य मनिषा म्हैसकर यांचा इशारा* 🛑

🛑 *नियम पाळा अन्यथा कोरोनाची दुसरी लाट….!टास्क फोर्सच्या सदस्य मनिषा म्हैसकर यांचा इशारा* 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : अवघे जग कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे धास्तावलेले आहे. आपण आतापर्यंत ही लाट रोखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र निष्काळजीपणे वागलो तर आपल्यालाही तिचा सामना करावा लागू शकतो, अशा इशारा राज्य टास्क फोर्सच्या सदस्य मनिषा म्हैसकर यांनी दिला आहे.

म्हैसकर यांनी कोरोना लाटेसंदर्भामत फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, सहा महिन्यानंतर मुंबईतील जनजीवन पुर्वपदावर येत आहे.  असे असले तरी कोरोनाच्या दुस-या लाटेची टांगती तलवार  डोक्यावर आहेच. अवघे जग या दुस-या लाटेमुळे धास्तावले आहे. आपण यापासून लांब असलो तरी हा धोका टळलेला नाही. दुसरी लाट आली तर मात्र इतरांना दोष देता येणार नाही. त्यासाठी स्वत: जबाबदार असू ,असे ही मनिषा म्हैसकर यांनी सांगितले आहे.

जुन-जुलै मध्ये नागरिकांनी फार चांगला प्रतिसाद दिला. सरकारी नियमांचे पालन केले. मात्र ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये नेमकी उलटी परिस्थिती दिसत आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा दिसला, नागरिक आत्मसंतुष्ट दिसले. मात्र हिच वर्तणूक घातक ठरू शकते. त्यामुळे कोरोनाच्या दुस-या लाटेला आमंत्रण मिळणार आहे.

तेव्हा आत्मसंतुष्ट होऊ नका,नियमांचे पालन करा असे आवाहन ही म्हैसकर यांनी केले आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी  “थ्री सी” चे नियम पाळणे आवश्यक असल्याचे ही त्या म्हणाल्या. “क्लोज स्पेस”, “कन्फर्म स्पेस” आणि “क्राऊडेड स्पेस” टाळायचे आवाहन ही त्यांनी केले आहे. त्यासह आपल्याला मास्क घालण्याची सवय करायला हवी.

बेजबाबदारपणा सोडायला हवा.  लस येत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची गरज असल्याचे ही त्या म्हणाल्या….⭕

anews Banner

Leave A Comment