• Home
  • महादेवाच्या काठीचे मुक्रमाबादेत जल्लोशात स्वागत :-

महादेवाच्या काठीचे मुक्रमाबादेत जल्लोशात स्वागत :-

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220330-WA0084.jpg

महादेवाच्या काठीचे मुक्रमाबादेत जल्लोशात स्वागत :-

नांदेड/ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

सगरोळी ते श्रीक्षेत्र शिखर शिंगणापुर निघालेल्या शंभू महादेवाच्या काठीचे मुक्रमाबाद शहरात दि.३० रोजी बुधवारी मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले.

सोमवार दि.२८ मार्च रोजी सगरोळी येथून मार्गस्थ झालेल्या शंभू महादेवाच्या काठी सोबत शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता.

हि पायी चालत जाणारी काठी सोमवार दि.११ एप्रिल रोजी श्रीक्षेत्र शिखर शिंगणापुर येथे पोहचणार आहे.

शेकडो मैलाचा ऊच्च तापमान असतानाही पायी प्रवास करत असताना कुठलाही थकवा न जाणवता पार होतो अशी भाविकांची ख्याती आहे. प्रत्येक गावातून पायी चालत जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत जाते.

सगरोळी ते शिखर शिंगणापुर हे तब्बल ४५० कि.मी.चे अंतर पायी चालुन देवांचा देव शंभू महादेवाचे दर्शन घेण्यात जो आनंद आहे तो आनंद जगातील कोणत्याच कुठल्याही देवस्थानात नसल्याचे पायी चालत जाणाऱ्या भाविकांनी आपल्या भक्तीमय भावना व्यक्त केल्या.

anews Banner

Leave A Comment