आशाताई बच्छाव
अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्र द्वारे १९ प्राध्यापकांनी बळकवाल्या नोकऱ्या.
—————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी राज्यपात्रता परीक्षा (सेट) अथवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) आवश्यक आहे. मात्र, काही जणांनी बनावट नेट-सेट प्रमाणपत्राच्या आधारे सहयोगी प्राध्यापक पदाची नोकरी बळकवल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग्न महाविद्यालयात तब्बल १९ प्राध्यापकांचे नेट-सेट प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र२७ ऑक्टोंबर२०२३ रोजी अमरावती विद्यापीठ ला प्राप्त झाले आहे. माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कला विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक तथा सहयोग प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २००४ मध्ये टी४३२६८७ फिजिकल एज्युकेशन नेट विषयाचे प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवली होती. तथापि, चव्हाण यांची नेट प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार राजभावनाकडे करण्यात आली होती. विद्यापीठ सुरेंद्र चव्हाण यांच्या नेट प्रमाणपत्राच्या चौकशी बाबतची माहिती युजीसी कडे अहवाल रूपात पाठविला. यूजीसी ने चव्हाण यांच्या नेट इत्यादी प्रमाणपत्राचे पडताळणी हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे पत्र यूजीसी ने अमरावती विद्यापीठ ला पाठविले आहे. यूजीसीच्या पत्रानुसार एका सहयोग प्राध्यापकांची नेट प्रमाणपत्र बनावट असल्याचे कळविण्यात आले आहेत साधारणतः अन्य १६ जणांची यादी आहे. त्यानुसार नेट-सेट प्रमाणपत्राची महाविद्यालयाकडून माहिती मागितली जाणार आहे. असे डॉ. तुषार देशमुख पूल सचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी माहिती दिली आहे.






