Home पुणे यंत्रणाच नसताना पुण्यातील रुग्णालय दवाखान्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण 🛑

यंत्रणाच नसताना पुण्यातील रुग्णालय दवाखान्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण 🛑

92
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 यंत्रणाच नसताना पुण्यातील रुग्णालय दवाखान्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे-:⭕ हॉस्पिटल्स आणि कोविड सेंटर्स मध्ये एकामागे एक आगीच्या दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर, सरकारने महाराष्ट्रातील रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर अनेक दिवसांनी जाग्या झालेल्या पुणे महानगरपालिकेने महापालिकेच्या दवाखाने आणि रुग्णालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश अग्निशामक दलाला दिले.

त्याप्रमाणे अग्निशमन दलाने आपले कार्य पार पाडले. मात्र यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे पुण्यातील बहुतांशी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुळातच हे अग्निरोधक अर्थात फायर एक्सटिंग्यूशरच नाही. काही रुग्णालयांमध्ये आहे तर ते वापरायचे माहित नाही आणि काही ठिकाणी नुसते शोभेचे पाईप लावून ठेवलेत आणि ते लावल्यापासून कार्यान्वितच नाहीत. ही अवस्था शासकीय इमारतींची असेल तर खाजगी इमारतींकडून काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न समोर येतोय.

हे प्रशिक्षण आणि तपासणी झाल्यानंतर चेकमेट टाईम्सने कोथरूड अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रूडकर यांना विचारणा केली असता, धक्कादायक खुलासे झाले असून, “आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय” या म्हणीप्रमाणे अवस्था झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पहा तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल…

एकूणच काय तर “विहिरतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?” या म्हणीप्रमाणे अवस्था झालेली असून, जर अग्निरोधक यंत्रणाच नाही तर त्याचे प्रशिक्षण देऊन पालिकेला काय मिळणार आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

तर स्थानिक नगरसेवक कोटींची उधळपट्टी सुशोभिकरणाच्या नावाने करत असताना, या अत्यावश्यक गरजांकडे कोण लक्ष देणार असा प्रश्नही उपस्थित होतोय.⭕

Previous articleपुण्यात ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त 🛑
Next articleनाशिक जिल्हा बँकेचा अजब कारभार; शेतकऱ्यांवर अन्याय, कर्जाबाबत अडवणूकीचे राजकारण..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here