• Home
  • गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात यावी आमदार कृष्णा गजबे यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंञी यांचेकडे मागणी

गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात यावी आमदार कृष्णा गजबे यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंञी यांचेकडे मागणी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220403-WA0067.jpg

गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात यावी

आमदार कृष्णा गजबे यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंञी यांचेकडे मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व अतिदुर्गम,अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य संदर्भ सेवेच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने आजारपणात रुग्णांची होत असलेली हेळसांड पाहु जाता गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयासह अद्यावत यंञणेणे सुसज्ज असे रुग्णालय स्थापन करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंञी ना.अमित देशमुख यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंञी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असुन जिल्ह्यात अद्यावत व सुसज्ज अशी वैद्यकीय व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील गरीब,आदिवासी नागरिकांना उपचारासाठी नागपुर येथील वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात संदर्भित करण्यात येते. गडचिरोली ते नागपुर अंतर लक्षात घेता बरेचदा रुग्णाचा प्रवासातच जीव जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दल,केंद्रीय राखीव पोलिस दल तसेच जिल्हा पोलिस दल कार्यरत असुन नक्षल विरोधी अभियान राबविताना उपरोक्त पोलिस दल व नक्षलवाद्यांत नेहमीच चकमक होत असते.दरम्यान चकमकीत गंभीर जखमींना उपचार्थ नागपुर येथे संदर्भित करण्यावाचुन पर्याय उरत नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनाकडून सुविधावाढ,खाटांची क्षमता वाढविण्यात आली असली तरी तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांची कमतरता असल्याने मनुष्यबळा अभावी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रुग्णांची होत असलेली एकुणच गैरसोय पाहु जाता शासनाने गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाला तत्वता मान्यता देखील दिली असुन त्या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चे दरम्यान उपरोक्त मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने व गडचिरोली जिल्ह्याची एकुणच भौगोलिक स्थिती लक्षात घेता येथे वैद्यकीय महाविद्यालयासह अद्यावत यंञणेणे सुसज्ज असे रुग्णालय स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार गजबे यांनी वैद्यकीय शिक्षण मंञी ना.अमित देशमुख यांना दिलेल्या निवेदनातुन केली असुन याच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील देण्यात आली आहे हे विशेष.

anews Banner

Leave A Comment