Home पुणे पुण्यात ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त 🛑

पुण्यात ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त 🛑

94
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पुण्यात ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शहरात बुधवारी सायंकाळी सहापासूनच तपास नाक्यांवर पोलिसांची पथके कार्यरत होती. रात्री आठनंतर फिरणार्‍या नागरिकांची कसून चौकशी करण्यात आली. तर, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य केले जात होते.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शहरात सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर तैनात केला आहे. पोलिस ठाण्यांना गुन्हे शाखा व विशेष शाखेचा अतिरिक्त बंदोबस्त मदतीसाठी देण्यात आला आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती व वाहनांची तपासणी केली जाणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत बंदोबस्त कशा पद्धतीने करावा, यासाठी वरिष्ठांकडून वेळोवेळी सूचना देण्यात येणार आहेत. संचारबंदी लागू होण्यापूर्वी बाजारामध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, सायंकाळी सहानंतर घराकडे जाण्यासाठी त्यांची घाई दिसून येत होती.

चोवीस तासांत ६६ जणांचा मृत्यू
पुणे : गेल्या 24 तासांत शहरात कोरोनाचे 4 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले. तर, 66 जणांना प्राण गमवावा लागला. त्यातील 20 जण पुण्याबाहेरील आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 895 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, सक्रिय रुग्णांची संख्या 53 हजार 326 वर पोहोचली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

शहरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम रुग्णसंख्या कमी होण्यामध्ये होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गेल्या 24 तासांत स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 21 हजार 325 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 4 हजार 206 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात गंभीर रुग्णांची संख्या 1 हजार 158 इतकी असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत 17 लाख 65 हजार 346 हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी 3 लाख 44 हजार 29 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी 2 लाख 84 हजार 801 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत 5 हजार 902 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.⭕

Previous articleअरे हे सरकार पाडणं, कोणा येरा गबाळ्याचे काम नाही” 🛑
Next articleयंत्रणाच नसताना पुण्यातील रुग्णालय दवाखान्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here