Home पश्चिम महाराष्ट्र अरे हे सरकार पाडणं, कोणा येरा गबाळ्याचे काम नाही” 🛑

अरे हे सरकार पाडणं, कोणा येरा गबाळ्याचे काम नाही” 🛑

96
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 “अरे हे सरकार पाडणं, कोणा येरा गबाळ्याचे काम नाही” 🛑
✍️ पंढरपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पंढरपूर :⭕राज्यात सध्या करोनासोबतच पंढरपूर पोटनिवडणुकीची देखील तितकीच चर्चा आहे. याला कारण, राज्यातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी, पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सरकार बदलायचं माझ्यावर सोडा’, असे विधान प्रचारसभेत केले होते. याला आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

‘भाजपचे नेते पंढरपुरात येऊन, ‘तुम्ही इथला आमदार निवडून द्या, राज्यातलं सरकार पाडून दाखवतो’, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, असं म्हणत शाब्दिक हल्ला चढवला आहे.तसेच त्यांनी भाजपवर टीका करताना, स्वतःच्या पक्षाचे आमदार फुटतील या भीतीतून भाजपकडून सातत्याने सरकार बदलाच्या वावड्या उठवल्या जात असल्याचा पलटवार केला आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राज्यात राजकारण होत आहे. अशी टीका देखील पवारांनी भाजपवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे.

या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार असून, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे..⭕

Previous articleस्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती उत्साहात साजरी…
Next articleपुण्यात ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here