Home Breaking News दिवाळी पहाट हे सांस्कृतिक सहभागाचे हे आदर्श प्रतिक – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

दिवाळी पहाट हे सांस्कृतिक सहभागाचे हे आदर्श प्रतिक – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

48
0

दिवाळी पहाट हे सांस्कृतिक सहभागाचे हे आदर्श प्रतिक – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी संस्थांचे कौतुक
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 3 :- कोणत्याही लोकाभिमुख उपक्रमासाठी समाजातील त्या-त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्त्व अत्यंत आवश्यक असते. नांदेडमध्ये कोरोनामुळे न होऊ शकलेले उपक्रम आता पुन्हा नव्या जोमाने आणि उत्साहाने साजरे होत आहेत याचे विलक्षण कौतूक वाटते. इथल्या सांस्कृतिक चळवळीतील प्रतिनिधींच्या कृतीशील सहभागाचे हे आदर्श प्रतिक असून दिवाळी पहाट कार्यक्रम त्यामुळेच यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.

नागरी सांस्कृतिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासनाने या उपक्रमाला पाठबळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा प्रशासन, नांदेड मनपा, गुरूद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाटचा विशेष कार्यक्रम नांदेड वासीयांच्या भेटीला दिला होता. दिनांक 24 ते 26 ऑक्टोबर या तीन दिवसाच्या कालावधीत बंदाघाट येथे झालेल्या सर्व कार्यक्रमास नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अत्यंत कमी कालावधीत हा कार्यक्रम यशस्वी झाला हे विशेष. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.

या यशस्वी संयोजनाबाद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष लक्ष्मण संगेवार, सदस्य विजय जोशी, विजय होकर्णे, ॲड गजानन पिंपरखेडे, बापु दासरी, वसंत मैय्या, उमाकांत जोशी, विजय बंडेवार, निळकंठ पाचंगे आदी उपस्थित होते.

Previous articleबाल विवाह थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Next articleजिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here