Home Breaking News आता बँक, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, उद्यापासून ७०० लोकल फेऱ्या धावणार!...

आता बँक, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, उद्यापासून ७०० लोकल फेऱ्या धावणार! 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

365
0

🛑 आता बँक, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, उद्यापासून ७०० लोकल फेऱ्या धावणार! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 2 जुलै : ⭕ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रवासाबद्दल सकारात्मक चर्चा झाली आहे. १ जुलैपासून बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, स्टॉक एक्सेंज कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रेल्वे मार्गवर सोमावरपासून तब्बल आता ७०० लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांची यादी रेल्वेला सादर होणार मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर १५ जून पासून मंत्रालय, पालिका कर्मचारी, पोलीस, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली आहे. परंतु पहिल्याच दिवसापासून लोकल प्रवासावरुन गोंधळ उडाला. बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालय कर्मचारी, बीपीटी, स्टॉक एक्सचेंजसह इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास नाकारण्यात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परिणामी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी लोकल प्रवासाची मागणी लावून धरली. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विचारणा केली होती. परंतु यासंदर्भात राज्य सरकारकडूनच निर्णय होत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर केंद्राने राज्य सरकारला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाची परवानगी देण्याची विनंती केली होती. यासंदर्भात सोमवारी रेल्वे अधिकारी, राज्य सरकार, पालिका, पोलीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार किती प्रवासी संख्या वाढेल याची विचारणा रेल्वेने राज्य सरकारकडे केली. त्यानुसार कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे. यादी येताच लोकल सेवांच्या फेऱ्या सुद्धा वाढ करण्यात येणार आहे.

या कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आयकर विभाग, जीएसटी व कस्टम, पोस्ट खाते,स्टॉक एक्सेंज, नशनल बँंक कर्मचारी,बीपीटी, न्यायालय, राजभवन,ईतर केंंद्रीय कर्मचारी व संरक्षण विभागातील कर्मचारी

उद्यापासून ७०० लोकल फेऱ्या धावणार अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरून २०० आणि पश्चिम रेल्वे मार्गवरून २०२ फेऱ्या आतापर्यत सुरू होत होत्या. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला अनुमती दिल्यामुळे उपनगरीय लोकल फेऱ्या वाढविण्यात आले आहे. ज्यामध्ये आता मध्य रेल्वे १५० अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गवर १४८ लोकल फेऱ्या वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गवर सोमावरपासून तब्बल आता ७०० लोकल फेऱ्या धावतील. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here