Home Breaking News अमूल बटरची! चायना विरुद्ध सोशल मीडियावर लढाई.. जाहिरात होतेय व्हायरल! 🛑 ✍️:(विजय...

अमूल बटरची! चायना विरुद्ध सोशल मीडियावर लढाई.. जाहिरात होतेय व्हायरल! 🛑 ✍️:(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

103
0

🛑 अमूल बटरची! चायना विरुद्ध सोशल मीडियावर लढाई.. जाहिरात होतेय व्हायरल! 🛑
✍️:(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

विशेष बातमी :⭕सध्याच्या भारत आणि चीन तणावावर भाष्य करण्यासाठी अमुलच्या क्रिएटिव्ह टीमनं भन्नाट जाहिरात केली आहे. सुप्रसिद्ध ब्रँड अमुल बटरची ही जाहिरात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत, यामध्ये अमुल गर्ल फ्रिजमधून बटर दाखवत STik With This Stok असं सांगत आहे. त्यासोबतच Amul We Chat over tea असाही उल्लेख करण्यात आला आहे. भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अमुलच्या या जाहिरातीतून प्रसिद्ध चिनी अ‍ॅप Tiktok आणि WeChat यांचा उल्लेख करत भारतीय उत्पादनांना प्राधान्य द्या असा संदेश दिला आहे.

याआधीही अमुलच्या ट्विटर हँडलने Exit The Dragon? असं वाक्य वापरुन एक जाहिरात केली होती. या जाहिरातीला सोशल मीडियात प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ट्विटरने अचानक अमुलचं अधिकृत ट्विटर हँडल ब्लॉक केले होते…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here