Home Breaking News कोल्हापुर ब्रेकिंग न्यूज 🛑* *आजअखेर 725 जणांना डिस्चार्ज* *मोहन...

कोल्हापुर ब्रेकिंग न्यूज 🛑* *आजअखेर 725 जणांना डिस्चार्ज* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.

118
0

🛑 *कोल्हापुर ब्रेकिंग न्यूज 🛑*
*आजअखेर 725 जणांना डिस्चार्ज*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.

*डॉ. बी. सी. केम्पी पाटील*
*जिल्हा शल्य चिकित्सक*
*कोल्हापूर,* दि. 2 : आजरोजी 333 प्राप्त अहवालापैकी 329 निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (यातील एकाचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आला आहे.) जिल्ह्यात आजअखेर एकूण 868 पॉझीटिव्हपैकी 725 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 131 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 3 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड तालुक्यातील-3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 81, भुदरगड- 76, चंदगड- 94, गडहिंग्लज- 105, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 58, करवीर- 26, पन्हाळा- 29, राधानगरी- 69, शाहूवाडी- 186, शिरोळ- 9, नगरपरिषद क्षेत्र- 48, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47 असे एकूण 851 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1 आणि सातारा-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 17 असे मिळून एकूण 868 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 868 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 725 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 131 इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here