Home रत्नागिरी लांजा-कनावजेवाडी रस्त्यावर आढळून आले खवले मांजर; तरुणांच्या सतर्कतेमुळे खवले मांजराचे वाचले प्राण

लांजा-कनावजेवाडी रस्त्यावर आढळून आले खवले मांजर; तरुणांच्या सतर्कतेमुळे खवले मांजराचे वाचले प्राण

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0047.jpg

लांजा-कनावजेवाडी रस्त्यावर आढळून आले खवले मांजर; तरुणांच्या सतर्कतेमुळे खवले मांजराचे वाचले प्राण

लांजा/रत्नागिरी,(सुनील धावडे) : तरुणांच्या सतर्कतेमुळे लांजा शहरातील कनावजेवाडी रस्त्यावर सापडून आलेल्या खवले मांजराला वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले. लांजा शहरातील कनावजेवाडी रस्त्यावर घटना घडली.

लांजा कनावजेवाडी येथील रहिवासी असलेले प्रशांत भालेकर, राहुल गुरव, सोन्या रेऊरकर, दीपक लांजेकर ,गणेश लांजेकर, शिवशंकर लाटकर हे तरुण नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास आपल्या घरी जात असताना कनावजेवाडी रस्त्यावर या तरुणांना खवले मांजर आढळून आले. खवले मांजराची शिकार केली जाते. त्यामुळे या तरुणांनी खबरदारी म्हणून या खवले मांजराला पकडले आणि याची माहिती लांजा वन विभागाचे वनरक्षक कुंभार यांना देण्यात आली. त्यानंतर वनरक्षक विक्रम कुंभार हे लांजा शहरात दाखल झाले त्यानंतर या तरुणांनी हे खवले मांजर त्यांच्या स्वाधीन केले.

अशाप्रकारे या तरुणांच्या सतर्कतेमुळे या खवले मांजराचे प्राण वाचले असून याबद्दल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या तरुणांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here